शिराढोण :-शुभम डांगे
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्याने चालू वर्षात आपण कोणत्याच महापुरुषांच्या जयंती साजरी करू शकत नाही परंतु त्यांचे विचार आपण विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचन करून आचरणात आणू शकतो. काल दि. 26एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंती होती सध्या सरकारने लॉकडाउन घोषित केल्यामुळे जयंती अथवा कोणते व्याख्यान आयोजित करण्याची संधी कोणाला भेटली नसेल तरी शिराढोण येथील नवतरुण गौरव बिच्चेवार यांनी मात्र ऑनलाईन च्या माध्यमातून सर्व जनतेला महात्मा बसवेश्वर यांच्या चरित्राचे प्रबोधन केले यावेळी ते म्हणाले कि समाजामध्ये असणारे अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती परंपरा कमी करून परस्परांतील मतभेद दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे जे महान संत-महात्मे होऊन गेले, त्यामध्ये बसवेश्वरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल कारण महात्मा बसवेश्वरांचे कार्य आणि विचार खूप महान आहेत संपूर्ण जगाला आदर्श वाटावे असे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनचरित्र आहे. बाराव्या शतकातील एक महान सामाजिक क्रांतिकारक होते. महात्मा बसवेश्वर यांना समाजातील कोणतीच विषमता मान्य नव्हती. परंतु बसवेश्वर यांच्या काळात वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद यांनी कहर केला होता. या विषमतेमुळे समाजात विस्कळीतपणा येऊन अराजकता निर्माण झाली होती. महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील या अन्यायकारक रुढी, परंपरा, अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजास एकसंघ केले. विषमता नष्ट करणारा 12 व्या शतकातला पहिला महामानव म्हणजे महात्मा बसवेश्वर होय. महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आणि मांडलेले विचार अव्दितीय आहेत असे ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा