""गत तीन वर्षापासुनचा दिव्यांगांचा राखीव निधी गेला तरी कुठे"" शेकडो दिव्यांग लाभाच्या प्रतिक्षेत जिल्हा परिषदेने गाठला दिव्यांगाप्रती ऊदासीनतेचा कळस :- राहुल साळवे
दिव्यांगांसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या अधिकार्याला तंबी.. - राहुल साळवे यांचा प्रभारी सीईओंना सवाल.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- लोकशाही मार्गाने विविध आंदोलने. ऊपोषणे करूनही 2016 ला झालेल्या निधी खर्चानंतर अद्याप जिल्हा परिषद नांदेड कडुन दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी खर्च करण्यात आला नाही हा निधी पूर्णत त्यावर्षी खर्च करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावरून पत्रके काढुन आदेशीत केले होते तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी ही वेळोवेळी हा निधी खर्च करण्याबाबत सुचना दिल्या होत्या तसेच या निधीचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती स्तरावरून शेकडो दिव्यांगांनी अर्ज दाखल केले होते परंतु गेंड्याची कातडी धारण केलेले जिल्हा परिषद मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी खर्चाबाबत मौन धारण केले आहे. एकतर पहिलेच आर्थिक संकट वरून या (लाँकडाऊन) संचारबंदीमुळे जिल्हाभरातील शेकडो दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली होती या संकटावर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. सतेंद्र ताराबाई वीरेंद्र आऊलवार यांनी आपल्या काही समविचारी व्यक्तीसह जिल्हा भरातील सर्व तालुक्यात जाऊन दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, शहीद जवान कुटुंबास त्यासह डाॅक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस कर्मचारी बांधव यांना भाजीपाला किटची वाटप केले या किटचा लाभ जिल्हातील जवळपास 4296 गरजवंताला झाला तसेच या ऊपक्रमाची दखल देशभरात घेतली जात आहे. समाज कल्याण अधिकारी आऊलवार हे ईथेच न थांबता त्यांनी अशा भुकेल्या व्यक्तींना *विश्वभोजन* ज्यामध्ये भात, वरण, चपाती, भाजी आणि लोंच पॅकिंग
दि. 22 एप्रिल, 2020 पासुन विश्वभोजन सुरू केले ज्यादवारे आतापर्यंत 1298 जनांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला. एका समाज कल्याण अधिकार्याकडून सबंध देशातील पहिलाच प्रसंग असेल आणि अशा अधिकार्यांना हा ऊपक्रम जो या लाँकडाऊनमुळे माणुसकीचा घास ठरत आहे हे ऊपक्रम सोडुन 24 तासात हजर राहण्याची तंबी देणारी बातमी वर्तमान पत्रात वाचताच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे जिल्हाभरातील शेकडो दिव्यांगांनी प्रभारी सीईओ कुलकर्णी यांच्यावर नाराजी व्यक्त करत आमच्या हक्काचा राखीव निधी तात्काळ आमच्या थेट बँक खात्यात जमा करावे असे समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या मार्फत एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा