२७ एप्रिल २०२०

झुमचा उपयोग करून झाली महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी,सोनकांबळे, मुंडकर आणि भोसीकर यांनी मांडले विचार




बिलोली

कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी राहत असताना महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करणे कठीण झाले असताना झुम अँप च्या (दृकश्राव्य) माध्यमातून उपयोग करून सर्वांना सामावून घेऊन मान्यवरांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी घेण्यात आला. यात कविता सोनकांबळे, गोविंद मुंडकर, अविनाश भोसीकर यांनी सहभाग घेतला होता.

महात्मा बसवेश्वर यांची जयंती प्रत्येकांनी घरी बसून साजरी करावी. अशी परिस्थिती कोरोना ने निर्माण केली होती. बिलोली तालुक्यातील अनेकांनी स्वयंस्फूर्तपणे घरी बसून महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली. यावेळी दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. कविता सोनकांबळे ,ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, बसव ब्रिगेड चे संस्थापक अविनाश भोसीकर यांनी आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. महात्मा बसवेश्वर यांचे समतेच्या विचार, बाराव्या शतकातील लोकशाही रुजवणारे अनुभव मंडप, यासह अनेक विषयावर विचारमंथन झाले. या विचार मंथनाच्या या कार्यक्रमात बिलोली, देगलूर, धर्माबाद, नांदेड या भागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सय्यद रियाज यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन पांडुरंग मामीडवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...