"राहुल साळवे यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिके मार्फत गरजु दिव्यांगांना घरपोच जेवणाला आजपासून सुरुवात"
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना या विषाणुच्या वाढत्या प्रभावामुळे देशात (लाँकडाऊन ) संचारबंदी लागु करण्यात आली आहे या लाँकडाऊन काळात बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ ऊपासमारीची वेळ येत असल्याची आणि यावर तत्काळ ऊपाय योजणा करावी तसेच दिव्यांगाना भुकबळीचा सामना करावा लागु नये यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहूल साळवे यांनी जिल्हास्तर आणि मंत्रालय स्तरावर तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात सर्व वर्तमानपत्रात हि बातमी प्रसारीत झाल्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेत मा.आयुक्त आणि ऊपआयुक्त यांच्या मार्गदर्षनाखाली महानगरपालिका हद्दितील गरजु दिव्यांगांना अडचण निर्माण होत असल्यामुळे अशा गरजु दिव्यांगांना दोन वेळचे जेवन देण्याकरीता श्री.अशोक सुर्यवंशी प्रकल्प संचालक एनयुएलएम यांची सदर कामासाठी समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र हाती घेताच आज दि 11/04/2020 रोजी महानगरपालिका एनयुएलएम विभागाचे काहि कर्मचारी आणि दिव्यांग संघटणेचे राहुल साळवे आणि संजय धुलधाणी यांना सोबत घेऊन मनपा शासकीय वाहनाद्वारे 90 गरजु दिव्यांगांना ते राहत असलेल्या विविध विभागात जाऊन जेवणाचे डब्बे देण्यात आले.गरजु दिव्यांगाना जेवण्याचे डब्बे दिल्यामुळे मनपा आयुक्त.ऊपआयुक्त आणि समन्वयक अधिकारीसह ईतर सर्व सहभागी झालेल्या कर्मचार्यांचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीकडुन राहुल साळवे आणि संजय धुलधाणी यांनी आभार माणत असाच काहिसा ऊपक्रम नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नगरपालिका/नगरपरीषद/नगरपंचायत आणि ग्रामीन.गाव खेड्यात सर्व ग्रामपंचायती.पंचायत समित्या आणि जिल्हा परीषदेने हि करावा जेणेकरून तळागाळातील गरजु दिव्यांग ऊपाशीपोटि झोपणार नाही किंवा भुकबळीला सामोरे जाणार नाही अशी मागणी केली आहे.
चांगला ऊपकम आहे सर 🙏🙏🙏🙏🌹🌹
उत्तर द्याहटवाSir mala sudha garej ahy
उत्तर द्याहटवा