जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सीमेवर झाले दाखल
महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेला नांदेड जिल्हा आणि खासकरून बिलोली तालुका याबाबत पोलीस आणि प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. याबाबत प्रश्न सीमावर्ती भागाच्या प्रमुखांनी आणि पोलिस विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून विविध बाबी विषयी चर्चा केली. तेलंगानातून किमान तीन हजार लोक महाराष्ट्रात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आणि जिल्हा हा पोलिस अधीक्षक यांनी बिलोली येथील तेलंगाना सीमेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील येसगी जवळील सीमेवर दोन ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पूर्वी फक्त कारला फाटा येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. नांदेड जिल्हा हा कोरोना बाबत ग्रीन झोन मध्ये जरी असला तरी कोरोना यास सीमेचे बंधन नाही. ही बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याला पुणे आणि मुंबई पेक्षा निजामाबाद जिल्ह्यापासून मोठा धोका असल्याचे आणि तेथे मोठ्या प्रमाणात संभाव्य करुणा बाधित असल्याचे यावेळी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख गोविंद मुंडकर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस ,प्रशासन आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर उपस्थित घेतलेल्या बैठकीत आपले मत व्यक्त केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस विभागाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान भ्रमणध्वनी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सीमावर्ती भागातील ग्रामस्थांची संपर्क साधला असता कळाले की मुख्य रस्ते आणि विविध गावच्या सीमा लगतच्या लहान-सहान रस्त्यावरून किमान तीन हजार लोकांनी तेलंगाना तुन महाराष्ट्रात आल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .गाव पातळीवर गाव दक्षता समिती स्थापन करून कोरोना रोखण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे . प्रश्न सीमावर्ती भागाची सोमवारी दुपारी योग्य अंतर ठेवून बैठक घेण्यात आली या बैठकीस सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, समन्वयक व्यंकटराव पाटील, गंगाधर प्रचंड, राजू पाटील ,राजू पाटील आदी उपस्थित होते. याबाबत जिल्हा प्रशासन अत्यंत सतर्क होऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी तेलंगाना सीमेवरील भागाची पाहणी केली यावेळी महसूल आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा