जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांच्या वॉटसप व इमेलव्दारे मध्यवर्ती बँकेचे निवेदनाद्वारे कळविली असता लवकरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले
बिलोली ता प्र :
बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली अडचन लक्षात घेऊन ही बंद असलेली बँक त्वरीत चालु करण्यात यावी अशी मनसेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी निवेदनाद्वारे डॉ विपीन इटणकर जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे
बिलोली तालुक्यातील राष्ट्रीयीकृत असलेले सर्वच बँका चालु आहेत यात व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग व इतर नागरीक यांचे खाते या राष्ट्रीयीकृत बँकेत असल्यामुळे व या बँकेच्या ग्राहकांच्या देवान घेवाणाचे व्यवहार चालुच आहेत मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु बँक म्हणून ओळखली जाणारी बँकच आज घडीला बंद असल्याने या बँकेतुन शेतकऱ्यांची पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारी अनुदान असे अनेक शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही जिल्हा मध्यवर्ती बँकेतच जमा होत असतात व होत आहेत असे असतानांच कोरोना या विषाणुंचे अख्या जगभरातच संकट आल्यामुळे सदरील जिल्हा मध्यवर्ती बँकेला बंद ठेवण्याचे शासनाने आदेश देण्यात आले त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे आर्थिक देवान घेवाणाचे व्यवहार बंद झाल्यामुळे शेतकरी यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे व या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अन्न धान्य, भाजीपाला व दुध पुरवठा करुन देणार्यां शेतकऱ्यांचीच बँक बंद करण्यात आले आहे व या मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार बंद पडुन त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनस्तरावरून अटी व शर्ती टाकुन बंद असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक चालु करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारात होणारी गैरसोय थांबवावी या आशयाचे निवेदन दिले असता जिल्हाधिकारी यानी यावर लवकरच निर्णय घेऊ असे कळवले व तसेच मा.राजसाहेब ठाकरे याच्या कानावर हा विषय टाकले असता त्याचे स्वीसांहायंक सचिन मोरी यानी पक्षा कडून राज्यपातीळवरुन प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. पुढील काळात म.न.से च्या मागनी ने बॅक चालु होईल का या कडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लांगले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा