१९ एप्रिल २०२०

सिमावर्ती भागात बिलोली पोलीसाचे कोरोना विषयी जनजागृती


 सिमावर्ती तेलंगना राज्यातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर बिलोली पोलिसाची  लाँकडाउन संदर्भात सिमावर्ती भागातील  गावोगावी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेऊन जनजागृती करीत आसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे

शेजारील तेलंगना राज्यातील निजामाबाद जिल्ह्यासह बोधन तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका  लक्षात घेऊन खबरदारीच्या पार्श्वभुमीवर  बिलोली पोलिस ठाण्याचे पो.नि.शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमावर्ती भागातील सगरोळी ,बोळेगाव ,शिंपाळा ,कार्ला दौलतापुर ,हिप्परगा थडी,येसगी, यासह आनेक सिमावर्ती  गावामध्ये लाँकडाउन संदर्भात तसेच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  सगरोळी येथिल बँकेत , किराणा दुकान  व भाजीपाला आदी ठिकाणी   लोकांची होणारी गर्दी  यामुळे सोशियल डिस्टंनसिगचा उडणारा फज्जा लक्षात घेऊन व शेजारील तेलंगना राज्यातुन  छुप्प्या  मार्गाने येणाऱ्या लोकाची संख्या व पुणे ,मुंबई शहरातुन  येणाऱ्या लोकासाठी कोरोनटाईम लाँकडाउन व ईतर महत्वपुर्ण जनजागृती संदर्भात गेल्या अनेक दिवसा पासुन सिमावर्ती   भागातील गावागावात   बिलोली पोलिस ठाण्याचे  पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक आहोराञ जनजागृतीचे मोहीम राबववत शासन व प्रशासनाच्या वेळोवेळीच्या आदेशास  सहकार्य करण्याचे अव्हाण करीत आसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे त्या अनुशंगान्वे  आज ता.१९ फेब्रुवारी रविवार रोजी बिलोली पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक व सगरोळी बिटचे सहाय्यक पो.उप.निरीक्षक जनार्धन बोधने यानी सिमावर्ती  मौ.शिंपाळा येथे भेट देऊन गावक-यांचे प्रश्न जाणुन घेऊन योग्य आसे मार्गदर्शन केले या वेळी गावक-यांच्या वतिने सिमावर्ती समन्वयक तथा पञकार राजु पाटील शिंपाळकर यानी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या  कौतुकास्पद कार्याबद्दल अभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...