नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असुन यात ना जात पात धर्म ना उच्च निच ना गरीब श्रीमंत असा कुठलाच भेदभाव न होता या संसर्गाची लागन सरसकट सर्वांनाच होत आहे त्यामुळे सर्व शासकीय रूग्णालये आणि खाजगी रुग्णालयात सुद्धा रुग्ण वाढत आहे जात आहेत तसेच मृत्युचे प्रमाण हि दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत परीणामी लाॅकडाऊन हाच एकमेव पर्याय प्रशासनापुढे येतो आणि शेकडो गोरगरीब ज्यांचे हातावर पोट आहे अशांना विविध संकटांचा आणि भुकमारीसह बेरोजगारीचा हि सामना करावा लागतो.
"सरकारी काम बारा महिने थांब" या म्हणीप्रमाणेच आज कोरोना या संसर्गावर उपचार घेत असलेल्या शासकीय रूग्णालयातील बाधीत रूग्णांवर ऊपचार घेतांना येऊन ठेपली आहे एकिकडे शासन स्तरावरून कोरोना बाधीत रूग्णांवर महात्मा फुले जिवनदायी योजणे अंतर्गत विविध खाजगी आणि शासकीय रूग्णालयात एक ते दिड लाख रूपयांपर्यत ऊपचारासह सर्व सोई सुविधा निशूल्क केलेल्या असतांना बर्याचशा शासकीय रूग्णालयात सुविधेचा अभाव पाहावयास मिळत आहे.
एखाद्या सर्व सामान्य गोरगरीबाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असता त्याला लगेच नजीकच्या शासकीय रूग्णालयात आयसोलेशन वार्डात भरती करून घेतले जाते तसेच त्याच्या घरातील सदस्यांना हि काॅरंटाईन करत संपूर्ण परीसर कंटेंटमेंट झोन मध्ये रूपांतरीत केले जाते.
परंतु लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असे घडत नाही त्यांना एका शहरातुन दुसऱ्या शहरात मोठ मोठ्या महागड्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते आणि ते बरे हि होतात आणि परत कामाला लागतात परंतु सर्व साधारण गोरगरीब व्यक्तिंचा कोरोना पाॅझिटिव्ह रिपोर्ट येताच त्यांच्यावर दुजाभाव करत विविध बंधने लादली जातात त्यामुळे सर्व साधारण गोरगरीब लोकांना आता शासकीय रूग्णालयातील उपचार पद्धतीवर शंका येत आहे या रूग्णालयात आपण दाखल होताच आपला हि मृत्यू होईल अशी भिती सर्व साधारण जनतेत पसरली आहे आणि परीणामी ते आप आपली तपासणी करण्यास हि पुढे येण्यासाठी घाबरत आहेत याला एकमेव कारण म्हणजे शासकीय रूग्णालयात उपचार न घेता मोठ मोठ्या शहरात जाऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे आणि बरे होऊन परत येणारे लोकप्रतिनिधीच आहेत यांच्या या वर्तनामुळे शासकीय रूग्णालयात विविध साधन सामुग्रीचा व उपचार पद्धतीचा अभावच आहे असे जाणवते.जोवर लोकप्रतिनिधीं शासकीय रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होणार नाहीत तोवर उपचार सुविधांमध्ये सूधारणा होऊन वाढ होणारच नाही असे मत राहुल साळवे यांनी मांडले आहे.
त्यामुळे या महामारीचा भेदभाव न करता सर्व सामान्य गोरगरीब जनतेसह लोकप्रतिनिधी यांनी हि शासकीय रूग्णालयातच उपचार घ्यावे जेणेकरून जनतेतील संभ्रम दूर होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा