मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समतादुत प्रयत्नशील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तर्फे कार्य करणारे बिलोली तालुका समतादुत शेख इर्शाद मौलाना यांच्या मार्फत आर टी ई चे आॕनलाईन मोफत अर्ज भरण्यात आले त्या गरिब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश मिळालेला आहे.
बार्टी मार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजना मागासवर्गीय जातीचे सर्वेक्षण ,आरटीई प्रवेश प्रक्रिया ,निवासी शाळा प्रवेश ,आॕनलाईन स्पर्धा परिक्षा,अण्णाभाऊ साठे गित गायन स्पर्धा ,कोरोना विषयी जन-जागृती,मोफत अन्न-धान्य किट वाटप,सॕनिटायझर व मास्क वाटप ,स्मशानभूमी वृक्षारोपण,स्वाधार शिष्यवृत्ती योजना,रमाई आवास योजना, कृषी योजना,इत्यादीच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम समतादुत करत आहे .
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, निबंधक यादवराव गायकवाड ,मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व समतादुत बार्टीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा