वृक्षलागवड करून त्याची निगा राखण्यासाठी पालकत्वाची दिली जबाबदारी.
प्रतिनिधी दि.२३/०७/२०.
सेवावर्धिनी संस्था पुणे व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने अटलास कापको संस्था पुणे यांच्या सहायातून मौजे मांजरम ता.नायगाव येथे महत्वाकांशी जलदूत 2.0 प्रकल्प प्रगतिपथावर आहे. पाण्याचा वापर,मृद व जलसंधारण व त्याची शाश्वतता निर्माण करणे यासाठी तांत्रिक व सामाजिक दृस्त्या माहिती तळागाळापर्यंत पोहचविणे व गावातून मृद व जलसंधाणाची परिपूर्ण माहीतगार तथा जलदूत निर्माण करणे हा मुख्य उद्देश जलदूत प्रकल्पाचा आहे. गावात विविध तांत्रिक माहिती संकलन सर्वेक्षणामार्फत सुरू आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आज दि.21 जुलै रोजी स्थानिक देशी वृक्षांचे महत्व गावकर्यांना सांगून देशी प्रजातींच्या लागवड करण्याचा कार्यक्रम संस्थेने ग्रामपंचायत च्या सहकार्यातून हाती घेतला आहे. विविध स्थानिक प्रजाती जसे वड,पिंपळ,बकुळा,कदंब,कडूनिंब,उंबर,करंज व कांचन आदि वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जि.प.शाळा,ग्रामपंचायत,कुसुमताई चव्हाण कन्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,गावातील मुख्य रस्ता आदि ठिकाणी वृक्षलागवड करून संबंधित व्यक्तींना या वृक्षांची निगा व काळजी घेण्यासाठी पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली.
सध्या कोरोंनाचा प्रादुर्भाव असल्याने शारीरिक/सामाजिक अंतर ठेवून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच प्रतींनिधी श्री सुरेशराव पोतदार.उपसरपंच श्री माधवराव शिंदे,सामाजिक कार्यकर्ते तथा रयत क्रांति संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष श्री पांडुरंग शिंदे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख,डॉ.श्रीनिवास बोरकर ,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालके,कुसुमताई कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड , सहशीक्षक श्री बैस सूर्यकांत शिंदे,श्यांमसुंदर शिंदे,दिगंबर शिंदे,वेंकटराव शिंदे,जलदूत श्री शिवाजी गायकवाड,वेंकट शिंदे,श्री विश्वनाथ शिंदे संस्था कार्यकर्ते श्री गंगाधर कानगूलवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Nice..
उत्तर द्याहटवा