जिल्हा परिषद बदली प्रकरणात दिव्यांग कर्मचार्यांचे आँनलाईन मेडिकल प्रमाणपत्र तपासूनच प्रक्रिया पूर्ण करा;राहुल साळवे यांनी केली तक्रार दाखल.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेअंतर्गत बहुचर्चित जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशन वेळा पत्रक दि २२ जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले तसेच या संदर्भातील आदेशाला मंजुरी हि देण्यात आली त्यानुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते ३० या चार दिवसांत बदल्यांची प्रकिया चालणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे या बदली प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी काही कर्मचार्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले असावेत अशी दाट शंका बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांना आली आहे कारण असे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासन सेवत भरती झालेल्या कर्मचार्याचे प्रकरण ईतर जिल्ह्यात ऊघडकिस आलेले आहेत या प्रमाणपत्राआधारे नजीकचे ठिकाण.बदली प्रकरणात सुट.ईन्कम टॅक्समध्ये सवलत.पदोन्नती यासह ईतर विवीध सुविधा मिळतात त्यामुळे राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर मुख्यमंत्री आणि जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीत म्हटले आहे की.जिल्हा परीषद मध्ये होत असलेल्या बदली प्रकरणात अपंग (दिव्यांग) कर्मचारी यांचे आॅनलाईन मेडिकल प्रमाणपत्र तपासूनच तसेच बेरा तपासणी करूनच पुढिल प्रक्रिया करावी असे राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा