बिलोली (इलियास शेख)
तालुक्यातील हिंगणी ते बडुर ३ किमी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १ कोटी ५४ लाख रुपये मंजुर झाले असुन रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट-कॉंक्रेट ऐवजी मजुराद्वारे सर्रासपणे दगड वापरले गेले असुन वरिष्ठ अधिका-यांनी तपासणी करुन पुलाचे काम थांबविण्याचे आदेश दिले.परंतु मुजोर गुत्तेदारांने अभियंत्यांच्या आदेशाला धुतकारुन त्या पुलाचे बांधकाम थातुर-मातुर केल्याने पावसाच्या पाण्याने पुलावर चिखल जमा झाल्याने तब्बल ४ तास वाहतुक ठप्प झाली.
गेल्या २० वर्षापासून केवळ डागडुगीवर चालत असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने आजी-माजी सरपंचाच्या पाठपुराव्याने शासनाकडुन लाखो रुपयांचा निधी मंजुर झाला असुन सदर रस्त्याचे रुंदीकरण व याअंतर्गत येणाऱ्या पुलाचे बांधकाम हे ७०% बोगस होत असुन ३०% काम इस्टीमेंट प्रमाणे होत आहे.पुलाच्या बांधकामासाठी '१.४५सेमी टॉप' मध्ये लागणारी सिमेंट रेतीची बचत करण्यासाठी संबंधित ठेकेदार दगडाचा वापर करीत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सुनिल पाटील नरवाडे यांनी उघडकीस आणले होते.परंतु याकडे ना गुत्तेदार,ना अभियंत्यांनी लक्ष दिले नसल्याने पाऊस पडला की? वाहतुक ठप्प होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याची उन्नती करण्याच्या हेतुने १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात झाले व ते काम जि.जे.कन्स्ट्रक्शनकडुन कामाची सुरुवातही झाली असुन संबंधित गुत्तेदारांकडुन पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट-काँक्रेट ऐवजी दगडाचा वापर केल्याचे अभियंत्याच्या चौकशीत उघड झाले असुन अभियंत्यांनी सर्व नियमांना धुतकारुन पुलाचे काम निकृष्ट केले असुन ते त्वरीत पाडुन बांधण्यात यावे व पुलाच्या भरणाकरीता काळी काढुन मुरुम टाकण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे सुनिल पाटील,चेअरमन रमेश ऐन्लावार,मेराज शेख यांच्यासह गावातील अनेकांनी केली आहे.
"पुलाचे काम निकृष्ट झाले असुन संबंधित गुत्तेदारांकडुन सिमेंट-कॉंक्रेट ऐवजी दगडाचा वापर करण्यात आल्याचे फोटो,व्हिडीओ माझ्याकडे आहेत.पुल पाडुन नविन बांधकाम करण्यात यावे,अन्यथा अमरण उपोषण करणार.
- सुनिल पा.नरवाडे
ता.उपाध्याक्ष सं.ब्रिगेड बिलोली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा