कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पावलेल्यांच्या परीवाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत तत्काळ आर्थिक मदत करा :- राहुल साळवे यांनी केली राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-कोवीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ लागु करण्यात आला आहे अशा आपात्कालीन परिस्थितीत तातडीची गरज या सबबीखाली राज्यांनी विविध उपाययोजना करत तातडीची आर्थिक मदत व पुनर्वसन करणे गरजेचे आहे.दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई, आर्थिक मदत इत्यादी वैद्यानिक उपाय होने गरजेचे आहे.सध्या कोरोना या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन शेकडो जनांना नाहक आपले प्राण गमवावे लागत आहेत शासन स्तरावरून एकिकडे शासकिय कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यास त्याच्या परीवाराला लाखो रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे म्हटले जाते तर दुसरीकडे या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या गोरगरीब जनतेच्या परीवाराला अद्याप कुठलीच आर्थिक मदत देण्याबाबत विचार केला गेला नाही या वैश्विक महामारीत मृत्युमुखी पडलेल्या गोरगरीबांना हि परीवार आहे आणि काही कर्ते धर्ते कमावतेच लोकच मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणार्या त्यांच्या परीवारांवर फार मोठे आर्थिक संकट ओढावले आहे तसेच एकतर १४ दिवस काॅरंटाईन करून २८ दिवस कंटेंटमेंट झोनमध्ये ठेवून त्यांच्यावर अवलंबीत सर्वांनाच पुढील अनेक महिने भुकबळीचीच समस्या भेडसावत आहे असाच काहीसा प्रकार कोरोना या वैष्वीक महामारीतुन बर्या झालेल्या रूग्नांबाबतहि आहे कारण तो रूग्न कोरोना बाधीत आढळताच त्याच्यासह संपूर्ण परीवाराला काॅरंन्टाईन केले जाते त्यामुळे संपूर्ण परीवार वर्षभर मोठ्या आर्थिक संकटात सापडतो म्हणुन अशांना देखील तत्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राहुल सिताराम साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर नांदेड जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातील कोरोना या वैश्वीक महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या परीवाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत ५ लाख रूपये आणी कोरोना बाधीत रूग्णांच्या परीवाराला १ लाख रूपये तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक जिल्हाधिकारीसह राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याकडे केली असल्याचे राहुल सिताराम साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा