०१ ऑगस्ट २०२०

सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 95 टक्के.


कुंडलवाडी प्रतिनिधी(मोहम्मद अफजल)
 येथून जवळच असलेल्या हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचा यंदाचा दहावीचा निकाल 95.45 टक्के लागला असून विद्यालयातून सर्व प्रथम कु.मानसी मंगेश थोबांळे 86.80℅ गुण मिळविले तर द्वितीय कु. राजनंदिनी हनुमंतराव नागनिकर 85.60 % घुण संपादन केले तर लक्ष्मण दिगंबर रोठेवाड यांने 83.20% गुण घेवून विद्यालयतून सर्व तृतीय येण्याचा बहूमान मिळवीले. विद्यालयातून 44 विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष प्राविण्यासह 8 प्रथम श्रेणीत 12 द्वितीय श्रेणीत 16 तर 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातील शवंत,गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य तथा संचालक लक्ष्मणराव ठक्करवाड, विद्यालयाचे मुख्याद्यापक बी.बी.जिंकले, सहशिक्षक डी.एस.बोडके,सौ. एम.डी. सोमवंशी,बी.एस.गुरुडे, सौ.एस.डी.देगावे,यू.व्ही.भाले यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...