कुंडलवाडी प्रतिनिधी (मो.अफजल)
दि.12 आँगस्ट रोजी शहरात एक कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळताच त्यांच्या संपर्कातील 25 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आले होते.त्यापैकी 8 व्यक्ती अॅटिजन रॅपीड चाचणी घेण्यात आली व 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते या पैकी 8 व्यक्तीचे अहवाल दि.13 रोजी निगेटिव्ह आले होते.बाकीचे 17 व्यक्तीचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले.यातील दोन व्यक्तींचा अहवाल पाँझिटिव्ह आले उर्वरित 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यावरून कुंडलवाडीत कोरोना पाॅझिटिव्ह संख्या तीनवर पोहचली.
तर पाँझिटिव्ह व्यक्तींचा संपर्कातील व्यक्तींचे स्वँब घेण्यात येणार आहे.अशी माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा