मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुंडलिक डुमणे गागलेगाव येथे यांचे दुःखद निधन

..     बिलोली ता.प्र.सुनिल कदम बिलोलो तालुक्यातील गागलेगाव येथील रहिवासी असुन कालवश. पुंडलिक  मरिबा डुमणे यांचे आज  दि. 28/11 नोव्हेंबर रोजी  संकाळी 11-30वाजता  त्यांच्या राहत्या घरी  दुःखद निधन झाले असुन मूव्यू समयी यांचे वय 75 वर्षे होते. त्यांच्या पच्यात पत्नी. दोन मुले.दोन मुली.सुन.जावयी नातवंडे असा  परिवार आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार दि.29/11 नोव्हेंबर रोजी उद्या  संकाळी 9 -00 वाजता मौजे गागलेगाव येथील  स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहे.

जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग साहित्याच्या प्रतिक्षेत :- राहुल साळवे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या पुढाकारातून दि १० डिसेंबर २०१९ ते दि २६ डिसेंबर २०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६ हि तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी लाखों रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते,तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली होती परंतु मार्च महिण्यातच कोरोना महामारीमुळे टप्याटप्याने लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला होता तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी डोंगरे यांची हि बदली झाल्यामुळे तसेच वाटपाचा ...

प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शेख जुनेद या दिव्यांगांची एम.बी.बी.एस साठी निवड

" हदगाव तालुका प्रतिनिधी :- हदगाव शहरात अती गरीब घराण्यात जन्म घेतलेल्या शेख जुनेद या दिव्यांगांचे वडिल अॅटो चालवुन आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवतात जन्मताच दिव्यांग असलेल्या जुनेदला अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिवाचे रान करावे लागले तरी सुद्धा प्रमाणपत्र मिळाले नव्हते तेंव्हा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज खांन महंमद अली खान यांना संघटणेचे हदगाव तालुका अध्यक्ष निहाल पटेल यांनी सविस्तर कळविले असता फेरोज खांन यांनी कुठलीच पर्वा न करता शेख जुनेद यांना थेट नांदेड येथील डाॅ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नेऊन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला त्याचेच फलीत म्हणुन शिक्षणात हुशार असलेला दिव्यांग शेख जुनेद यांने थेट एमबिबिएसलाच मजल मारत गोरगरीब आई वडील भाऊ बहीण आणि फेरोज खांन यांचे नाव उज्वल केले याच्याच अणुशंगाने आज दि १७ नोव्हेंबर २०२० रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती हदगाव कडुन मराठवाडा अध्यक्ष फेरोज खांन महंमद अली खान यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद शादि खाना येथे सत्कार समारंभ आयोजित के...

बिलोलीत अंधाऱ्या घरात दिवा आणि उपेक्षितासोबत केली दिवाळी

बिलोली शहरातील उपेक्षितांच्या वस्तीत जाऊन अंधाऱ्या घरात दिवे लावण्याचा उपक्रम नेहमीप्रमाणे या वर्षीही करण्यात आला. विगत अनेक वर्षापासून उपेक्षितांच्या घरात दिवा लावून दिवाळी साजरा करण्याचा उपक्रम बिलोली येथे स्वयंस्फूर्तीने  केला जातो. या उपक्रमात सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व्यक्ती सहभागी होतात. यावर्षीही उपेक्षित आणि अंधाऱ्या घरात दिवे लावण्याचा उपक्रम सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून केला.  यात बिलोली येथील  गोविंद मुंडकर, बालाजी गेंदेवाड, यांच्या पुढाकाराने श्री राम शिवापनोर, श्रीमान कोंडलवाडे, रियाज सय्यद, बसवंत मुंडकर, गागीलगे, कसलोड, वैभव आणि अमोल गेंडेवाड यांच्या परिश्रमाने हा उपक्रम यशस्वी झाला. या उपक्रमात शहरातील विविध जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते.

देगलूरचे समाजसेवक धनाजी जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2020 जाहीर

देगलूर-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये देगलूरचे समाजसेवक धनाजी भाऊ जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते धनाजी जोशी यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून तसेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले असून कोरोणाच्या महामारी संकटात केलेली मदत असे अनेक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे धनाजी जोशी यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार देण्यात आला असुन त्याबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे....

नांदेड येथे बेरोजगार दिव्यांगांच्या विद्रोही आंदोलन

  नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन राहुल सिताराम साळवे यांच्या नेतृत्वात आज दि २ नोव्हेंबर २०२० रोजी विद्रोही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनात जाहिर पाठिंब्यास्तव सहभाग संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड दिवयांग आघाडी नांदेड,भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड/नांदेड/अर्धापुर,दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती.बिलोली.अर्धापुर.भोकर.ऊमरी.धर्माबाद.हिमायतनगर.नायगाव - नरसी.देगलुर.कंधार. माळाकोळी.लोहा.फेरोज खान दिव्यांग संघर्ष समिती हदगाव.मुकबधीर कर्णबधीर संघटणा नांदेड.ब्लाईंड संघर्ष समिती नांदेड यासह जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते. या आंदोलणाची सुरूवात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तद्नंतर जिल्हा परिषद कार्यालयाकडे लेझीम/दांडिया आणि आक्रोश नारेबाजीच्या रूपात मोर्चा काढत दोन तास ठिय्या आंदोलन करत लेखी पत्र घेतल्या शिवाय गेट सोडण्यात आले नाही या लेखी पत्रात असे सांगण्यात आले...

हिवताप व हत्तीरोग विभागातील प्रलंबित मागण्या बाबत चर्चा

आज दि. २ नोव्हेंबर रोजी मा.डॉ देशमुख साहेब सहसंचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या कडे हिवताप व हत्तीरोग विभागातील प्रलंबित मागण्या बाबत चर्चा करण्यात आली.  १) आश्वासित प्रगती योजना १०, २०, ३० वर्षे चे लाभ दिपावली पर्यंत आदेश देण्यात येणार आहेत. २) आरोग्य पर्यवेक्षकातून ADMO पदी पदोन्नती देण्यात यावी. ३) आरोग्य सहाय्यकतून आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देतांना ७५% आरोग्य सहाय्यकातून व २५ % प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या तून सेवा जैष्ठता करण्यात यावी. पदोन्नती देतांना ३:१  प्रमाणे देण्यात यावी.  ४) नामकरण आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यक यांचे आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक यांचे आरोग्य विस्तार अधिकारी असे नामकरण करण्यात यावे.  ५) क्षेत्र कर्मचारी यांची पदोन्नती आरोग्य कर्मचारी पदी विभागवार जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कडून लवकरात लवकर करण्यात यावी.  ६) हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी हे कोरोना कोविड-१९ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांना जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी यांच्या मार्फत कोरोना योध्दा प्रमा...

महालनबाई लक्ष्मणराव धमनवाडे यांचे निधन

          यशवंतराव चव्हाण हायस्कुल बिलोली सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश धमनवाडे यांची आई महालनबाई लक्ष्मणराव धमनवाडे  यांचे वृध्दापकाळाने आज दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 1:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर दि.2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता मुळगावी गोळेगाव ता.नायगाव येथील स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात तीन मुलं,दोन मुली,सुना,नात,नाती,नातवंड असा मोठा परिवार आहे.त्या यशवंतराव चव्हाण हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश लक्ष्मणराव धमनवाडे यांच्या आई होत्या.