१० जानेवारी २०१९

भारतीय संस्कृतीत आई हा एक महत्वाचा घटक - कुलगुरू उद्धव भोसले

बिलोली :- जगातील विकसीत देशांमध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे.परदेशात आई,वडील मुलं मुली हे वेगवेगळे राहतात.पण भारतामध्ये एक अशी कुटुंब पद्धती आहे ज्यात आपण आई वडीलांसह राहतो.आणि हिच महत्त्वाची बाब असून बाहेरील देशामध्ये आज भारतीय पद्धत बाळगत असल्याचे पाहावयास मिळते.भारतीय संस्कृती मध्ये आई ही एक महत्वाचा घटक असून आई हीच गुरू आणि आई हिच कुलगुरू आहे.असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू उद्धव भोसले यांनी केले.
   ते दि.७ जानेवारी रोजी बिलोली येथे आयोजित सत्कार सुह्रदयी व्यक्तींचा अन् सन्मान माईचा या कार्यक्रमा अंतर्गत सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणी या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालिका श्रीमती भागिरथीबाई बसवंतराव मुंडकर यांचा कुलगुरू उद्धव भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी आ.वसंतराव चव्हाण, माधवराव पा.शेळगावकर, विक्रम साबणे,व्ही,जे वरवंटक ,गिरीधर पा,डाकोरे , आदींची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आले.तद्दनंतर आयोजन समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थी मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू उद्धव भोसले,नायगाव मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.व कुलगुरू उद्धव भोसले यांच्या हस्ते श्रीमती भागिरतीबाई बसवंतराव मुंडकर यांचा भव्य असा सन्मान करण्यात आला.सत्काराच्या कार्यक्रमानंतर सप्त खंजेरी,राष्ट्रीय प्रबोधनात्मक किर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी या कार्यक्रमास बिलोली शहर व परिसरातील चार हजार श्रोत्यांनी आपली हजेरी लाऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकरराव मुंडकर,व्यंकटराव मुंडकर,बालाजी गेंदेवाड,गंगाधर बिंगेवार,शंकर हंमद,नागनाथ इळेगावे, हवगिर लोळे.जितेंद्र तोटलवार,नागनाथ गोजे,साईनाथ मुंडकर,बसवंत मुंडकर ,प्रभुनाथ देशमुख आदींनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक गोविंद मुंडकर यांनी केले.तर सुञ संचलन गोपाळ चौधरी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...