१८ जानेवारी २०१९

20 जानेवारी रोजी कासराळीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन



बिलोली - (ता.प्र.) सन 1966 रोजी  स्थापना करण्यात आलेल्या  बिलोली तालुक्यातील कासराळी  येथील लाल बहादुर शास्ञी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक २० जानेवारी रोजी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.
   सर्वात जुनी शैक्षणिक संस्था अशी ओळख  समजल्या जाणाऱ्या कासराळी येथील लाल बहादुर शास्ञी विद्यालयाची मुहुर्तमेढ गणेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन प्रा.श्रीराम करडखेडकर यांनी रोवली.तर ती चालवण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ.गंगाराम ठक्करवाड त्यांचे चिरंजीव तथा संस्थेचे कोष्याध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कासराळी सारख्या ग्रामिण भागात शिक्षणाची  विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली,सदर संस्थेतुन मोठ्या पदावर अनेक विद्यार्थी गेले  असुन त्यात विजय कुमार बुट्टेपवाड हे राज्यउत्पादन विभागात अधिक्षक,दिंगबरराव लोकमनवार नांदेडच्या पाँलटेकनिकल काँलेजात HOD या पदावर,पिंपळे बालाजी शंकरराव शंकरनगरच्या लोककला वानिज्यविज्ञान महाविध्यालयात प्राचार्य या पदावर,अशोक देवकरे हे शिक्षणाधिकारी,डाँ.बालाजी सातमवाड हे कुंडलवाडी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी या सह देश विदेशात या शाळेचे विध्यार्थानी मजल मारली आहे.  १९६६ ते २००० या वर्षातील सर्व विध्यार्थांची गाठीभेटी  व्हावी या हेतुने शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि.20 जानेवारी रविवारी रोजी कासराळी येथील लाल बहादुर शास्ञी विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10ः30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास संस्थाध्यक्ष प्रा.श्रीराम करडखेडकर , माजी आ.गंगाराम ठक्करवाड , सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव , संस्थेचे सचिव अॕड.चंद्रकांतराव बिलोलीकर प्रा.दिगंबरराव लोकमनवार आदि उपस्थित राहणार आहेत.याशिवाय  माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने  उपस्थित राहणार असुन सर्वांना निमंत्रीत करण्यात आलेच आहे जर कोन्ही चुकुन राहीलेतर हेच निमंत्रण समजुन उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कोष्याध्यक्ष तथा जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...