२२ जानेवारी २०१९

बिलोली तालुक्यातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचे लघू पाटबंधारे विभागास पञ

बिलोली-  तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागात असलेल्या गावातील मालगुजारी तलावांच्या दुरूस्ती बाबत प्रश्न सिमावर्ती भागाच्या समन्वयकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित विभागास केलेल्या मागणीवर उचित कारवाई करण्याचे पञ दिले आहे.बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर,  आणि  समन्वयक गंगाधर प्रचंड,राजेद्र पाटील,राजेद्र पा.शिंदे,व्यंकटराव सिदनोड,चंद्रकांत लोखंडे यांच्या सह विविध गावचे सरपंच व नागरिकांनी चवळवळ सुरू केली आहे.अखंड महाराष्ट्रात राहूनच बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना उत्तम सोई सुविधा मिळाव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण,विभागीय आयुक्त भापकर,जिल्हाधिकारी डोंगरे यांच्यासह आमदार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सिमावर्ती भागाच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती.व तसेच मालगुजारी तलावांच्या दुरूस्ती साठी खाजगी सचिव पर्यावरण मंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत सचिवांनी पाठवलेल्या पञा नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित विभागास तेलंगणा राज्याच्या सिमावर्ती भागाला लागून असलेल्या बिलोली तालुक्यातल्या गावातील मालगुजारी तलाव दुरूस्ती बाबत नियमानुसार उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची माहिती कार्यालयास कळविण्याचे पञ दिले आहे.विशेष म्हणजे लघू पाठबंदारे विभागाच्या वतीने सिमावर्ती भागातील काही तलावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून सिमार्ती भागाच्या समन्वयकांनी केलेल्या तलाव दुरूस्तीची मागणीची पुर्ण झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...