२७ जानेवारी २०१९

चिटमोगरा येथिल कला महोत्सवात महाराष्ट्ररत्न राजु पाटिल यांचा भव्य सत्कार

बिलोली तालुक्यातील  मौ.चिटमोगरा  येथे आज दि २६ जानेवारी रोजी  शनिवारी प्रजासत्ताक दिना निमित्त जि.प.प्राथमिक शाळेच्या वतिने संध्याकाळी ०७ वा. सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजित कार्यक्रमात नुकतच   महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित झालेले  बिलोली चे पञकार राजु पाटिल शिंपाळकर यांचा शालेय व्यवस्थापन समिती व गावक-यांच्या वतिने भव्य आसा सत्कार करण्यात आला.

येथिल जि.प.शाळेच्या वतिने गेल्या तिन वर्षा पासुन सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोज करण्यात येते .या कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रमुख  मान्यवरांच्या उपस्थित राजु पाटिल यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेट स्वरुपात  पुस्तक देउन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी संस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळी चेअरमन मा.प्रमोद देशमुख तर
प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथिल प्रसिद्ध  उद्योजक  मा.अशोक पिलगोंडे  स्वाभिमानी  संभाजी ब्रिगेड जि.अध्यक्ष हाणमंत पाटिल वाडेकर ,सरपंच संघनेचे जिल्हाअध्यक्ष  सतिश पाटिल,केंद्र प्रमुख अटकळी मठदेवरू पञकार भास्कर भेदेकर,नागनाथ गोजे आदि मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते.तसेच या वेळी पञकार सय्यद रियाज ,आशोक जाधव ,संजय पोवाडे ,आनंदराव डाकोरे ,डि.जी.भेलोंडे,एस.एम.पांचाळ ,बि.एम.झुंजारे ,जाबनोरएन.डी.,धम्मदिप भेदेकर ,एकनाथ पेंटे यांच्यासह  विद्यार्थी , शिक्षक वर्ग  व गावकरी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थिताचे मने जिंकली.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक बंडु पाटिल भोसले शालेय व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी ,गावकरी  व सर्व शिक्षकवृद प्रयत्न केले.N

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...