२८ जानेवारी २०१९

आरंरं बापु . ..पाहिजे का सर्व सुख खंडिभर ... तर झोपुनी बघ एकदा मायीच्या मांडीवर ..


सद्य  पस्थितीवर भाष्य करणा-या कविता....ग्रामीण कौटुंबिक हितसंबंध जोपासतांना आईवडीलांची होणारी परवड..यावर जबरदस्त भाष्य करणारी"काजळमया"ही कथा...आपल्या उत्कृष्ट शैलीतुन..साहित्य रसिकांना खिळवून ठेवणारे अष्टपैलू साहित्यिक बालाजी पेटेकर खतगावकर यांच्या ग्रामीण बोलीभाषेतील गावढाली शब्दातून व्यक्त होणा-या भावना काळजाला भिडणारा आवाज..शेवटपर्यंत साहित्य रसिकांना खिळवून ठेवला.  ...पैसा,प्रसिद्धी, सत्ता,यांच्या मागे लागलेल्या आजकालच्या माणसांना सुखाची हमी देणारी कविता "पाहिजे असेल तुला सुख खंडिभर तर झोपुन बघ एकदा आईच्या मांडीवर "...शेतकरी बापाच्या व्यथेची कथा सांगणारी कविता "शेतकरी राजा"..राजकारणात चाललेल्या विघातक कृतीचा समाचार घेणारी "काढला माझा काटा" ही कविता विविध विनोदी प्रसंगातुन हास्याचे फवारे उडवत रसिकांना चिंब भिजवत बांधुन ठेवले. बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील जय किसान विद्यलयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ग्रामीण कवी बालाजी पेटेकर खतगावकर यांनी अत्यंत दर्जेदार कविता सादर केले.जगात आई,वडील आणि शिक्षक यांनाच आपला पाल्य किंवा विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठ झाल्यावर पाहण्यात खरा आनंद होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनी आई,वडील व शिक्षक यांना कधीच विसरू नका.असे प्रतिपादन त्यांनी केले.पुढे बोलताना  बालाजी पेटेकर म्हणाले की शिक्षणाबरोबर संस्कारही देणे गरजेचे आहे.
 शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व शालेय साहित्य,पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव उमाकांत गोपछडे, होते.तर प्रमुख उपस्थितीत केशवराव नावाडे, रमाकांत कुलकर्णी,हावगीराव पाटील,बळवंत पाटील लुटे सय्यद रियाज  ,श्रीरामे साहेब,रामपुरे पाटील,माणिकराव पाटील, हे होते. कार्याक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पांचाळ सर यांनी केले तर आभार विजय होपळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एच बी गोपछडे,पांचाळ शंकर,विजय होपळे,हासगुळे सर,सुवर्णकार सर,राम राजुरे,लगडे सर पाटील सर,आगशे सर,होरे सर,सौ.रुपाली गोपछडे,सर्व कर्मचारी यांच्यासह शाळेच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...