राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांना स्त्रीयाप्रती आदर आणि आई - वडीलाप्रती सन्मान व स्नेहाची शिकवण दिली. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी शिवरायांना आईचा सल्ला मोलाचे वाटला. माञ आजचे सुशिक्षितांचे आई वडिल वृद्धाश्रमात पहायला मिळतात. शिक्षणाने माणसं मोठी होतात पण ते संस्कार विसरतात. जन्मदात्या माता-पित्यानां मरण यातना देणारी आजची पिढी हे विसरून जात आहे. असे मत व्याख्यानकर्ते श्री सोपान कदम यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी सगरोळीच्या सरपंच सौ.सुजाता सिध्दनोड व जि.प. सदस्या श्रीमती सुंदराबाई नागनाथ मरखले, तानाजी पाटील यावेळी उपस्थित होते.
छञपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची जयंती दि 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मुख्य रस्त्याने भव्य शिव रथ रँली काढण्यात आली. या शिव रथ रँलीत ग्रामस्थ, शिवप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते या रँलीत जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणुन सोडला होता. गतवर्षी प्रमाणे यावर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने व्याख्यान व रथ रँलीचे चांगले कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सायकांळी 7 वाजता अल्पपोहारामधे खिचडी वाटप करण्यात आले होते.
संध्याकाळी रात्री 8 वाजता शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयाला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार टाकून व दिप प्रज्वलीत करुन अभिवादन करण्यात आली. शालेय विद्यार्थीच्या वतीने पथनाट्य, शिवकालीन लढाईचे प्रात्यक्षिके, पोवडा, शिवरायांचे विचार नाटकांतुन मांडण्यात आले. तद्नंतर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने काश्मीर पुलवमा येथे शहीद झालेल्या जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व महिला, तरुण मंडळी उपस्थित होती.
सोपान कदम पुढे बोलताना म्हणाले स्त्री - पुरुष समानता काय असते. हे शिवाजी महाराज राबविण्याचं काम केलं. माझ्या स्वराज्यातील व माझ्या समाजातील कुठल्याही स्त्रीला केसालाही धका लागणार नाही. हे आपल्या स्वराज्यात स्त्री समानता हे काय असतं हे शिवचरिञातुन शिकायला मिळते व ते राबविण्याचं काम त्यांनी केले. यातुनच समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिवचरित्र वाचूनच वागणूक आपल्या अंगी जोपासायला पाहिजे. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन व प्रास्तविक श्री गंगाधरराव पा. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालाजी पाटील यांनी मानले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सार्वजनिक समितीने परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा