कंधार तालुक्यातील बारूळ येथे प्रधानमंत्री उज्वल गॅस योजनेअंतर्गत मे. मनार एजन्सी धारकाकडून गॅस घेणाऱ्या नागरिकाकडून ५०० ते १५०० रुपये घेऊन नागरिकांची आर्थिक लूट होत आहे ते तात्काळ थांबवण्याच्या मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
पण राज्य शासनाने गोरगरीब जनतेला राज्य धुर मुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी प्रधानमंत्री उज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस व शेगडी घेण्यासाठी १०० रुपयांमध्ये उपलब्ध असताना देखील बारूळ येथे में. मनार इंडियन सर्विस एजन्सी धारकाकडून बारूळ परिसरातील औराळ नंदनवन चिखली सावळेश्वर मंगल सांगवी बामणी धर्मापुरी या गावातील जनतेकडून प्रत्येकी कनेक्शन व गॅस टाकीसाठी त्यांच्याकडून ५०० ते १५०० रुपये घेऊन प्रधानमंत्री उज्वल योजना अंतर्गत येणारे गॅस दिले जात आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना सन २०१६ पासून सुरू केली आहे या योजनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील कुटुंब व अंत्योदय अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी जंगल प्रभावित कुटुंब अति मागास प्रवर्ग नदी काठालगत चे कुटुंब यांचा प्राधान्याने समाविष्ठ आहे ग्रामीण भागातील स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या नेहमीच निर्माण होते तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे पर्यावरणाचा हास्य होऊन प्रदूषणात वाढ होते त्यासाठी केंद्र सरकारी प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना सुरू करण्यात आली पण खऱ्या अर्थाने या लाभार्थ्याकडून बारुळ परिसरात आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी वरील एजन्सी धारकाची तात्काळ चौकशी करून ग्रहकाचे घेतलेले पैसे तात्काळ परत देण्यात यावे व बारूळ परिसरातील नागरिकांची होणारी लूट तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी साहेब यांना मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा