बिलोली : तालुका प्रतिनिधी
अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी, सचिव मार्तंड जेठे,कार्याध्यक्षपदी सुर्यकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष टी. एम वाघमारे यांनी घोषित केले आहेत.
ययावेळी जिल्हा सचिव बी.पी.गायकवाड,नायगावचे तालुका अध्यक्ष पी.एम.काेतेवार
यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर परिषदेची बैठक मंगळवार दि. १२ मार्च राेजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष टी. एम.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका केंद्र बिलोली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेच्या नियम व अटी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक नायगाव तालुका अध्यक्ष पी. एम.काेतेवार यांनी केले. सखोल चर्चेअंती बी. पी.गायकवाड यांनी सुचविल्याप्रमाणे अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी तर सचिवपदी मार्तंड जेथे, कार्याध्यक्ष पदी गायकवाड एस.एन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आभार प्रदर्शन नवनियुक्त तालुका अध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा