१३ मार्च २०१९

घरी आभ्यास करुन लक्ष्मी बनली पी.एस.आय


 बिलोली  एम.पी.एस.सी.परिक्षेसाठी कुठेही क्लासेस न लावता स्थितीची जाणीव ठेवून प्रचंड आत्मविश्वास जिद व चिकाटीच्या जोरावर  अभ्यास करुन बेळकोणी ( बु) ता.बिलोली येथिल लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हीने एम.पी.एस.सी.परिक्षेत पि.एस.आय.पदासाठी ओ.बि.सि.प्रवर्गातुन राज्यात दुसऱ्या क्रमांकाने ऊत्तीर्ण होवुन यश मिळविल्याने बिलोलीत भव्य असा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थीनीने प्रशासकीय सेवेचे हे घवघवीत यश संपादन केल्याने

  बिलोली पोलिस स्टेशन येथे पुरोगामी पञकार संघ व शहर वासीयांच्या वतीने लक्ष्मी डाकेवाड हिचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान धबडगे,पुरोगामी पञकार संघाचे अध्यक्ष मारोती भालेराव,कार्याध्यक्ष सुनिल कदम,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, नगरसेवक प्रकाश पोवाडे,पञकार रत्नाकर जाधव,संजय जाधव, शेख पाशाभाई,अबरारबेग,यांच्यासह अनेकांनी शाल पुष्पहार देऊन डाकेवाड हीचा सन्मान केला.यावेळी  मारोती भदरगे, सय्यद  रियाज सुनिल जेठाळकर,शेख सुलेमान .  प्रल्हाद वाघमारे.   लालबा  गोणेकर .सुरेश देवकरे. कर्मचारी सोनकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

बिलोलीतील माझ्या मुलींचा केलेला हा सन्मान पाहून अगदी भारावुन गेलो.- मुलीचे वडील प्रल्हाद डाकेवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...