दोन मुले शिक्षणासाठी घेतली दत्तक
अर्धापुर तालुक्यातील सावरगाव येथील आंदोलक मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या कुटुंबाला मुबंई येथील आवाज फौंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देऊन त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी फौंडेशनच्या अध्यक्षा सुषमा मोर्या यांनी घेतली आहे.यावेळी त्यांच्या घरी जावुन मदतीचा हातही दिला यावेळी बिलोलीचे सामाजीक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक साईनाथ अरगुलवार हे उपस्थित होते.
सावरगाव ता.अर्धापुर येथे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गणपतराव बाबाराव आबादार यांनी बलिदान दिले होते. त्यांना पत्नी व दोन मुले असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.दोन मुलांच्या शिक्षणासाठी मुबंई येथील आवाज फाऊंडेशनच्या सुषमा मोर्या यांनी त्यांची दोन मुले व्यंकटेश आबादार, व धनश्री आबादार यांना दत्तक घेऊन पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून धनादेश दिले. यावेळी आवाज फौंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष छगन पाटील सांगोळे,मनकर्ण आबादार,यशोदा कोळी,वंदना सांगोळे, कैलास कोळी,गजानन आबादार, ज्ञानेश्वर कदम,राम किशन आबादार, संदीप जाधव यांची बिलोली आर्ट आँफ लिव्हींगचे तालुका प्रचारक तथा सामाजीक कार्यकर्ते साईनाथ अरगुलवार उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा