०९ मार्च २०१९

शिवाजीनगर शाळा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

   तासगाव:  सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक पुरस्काराचे मंगळवारी शानदार सोहळ्यात सांगलीमध्ये वितरण संपन्न झाले. सांगली जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष .संग्रामसिंह देशमुख,शिक्षण सभापती  तमन्नागौडा रवी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजीत राऊत,शिक्षणाधिकारी सौ.निशादेवी वाघमोडे मॅडम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

          स्वच्छ,सुंदर व आदर्श शाळा पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले पहिली ते पाचवी द्विशिक्षकी गटामध्ये शिवाजीनगर( सावळज)जिल्हा परिषद शाळेने चौथा क्रमांक पटकावला आहे.शिवाजीनगर शाळा ही 48 घरे असणारी छोटी वस्ती शाळा असून शैक्षणिक उठावात मात्र या शाळेने मोठी कामगिरी केली आहे आतापर्यंत इथल्या पालकांनी अनेक कामे शैक्षणिक उठावातून केली आहेत.पालकांचे या शाळेस नेहमीच सहकार्य लाभले आहे.पालकांना शाळेविषयी प्रेम व आपुलकी आहे या आपुलीमुळे शिक्षक व पालक यांचे सुंदर नाते निर्माण झाले आहे यातूनच शाळेने आतपर्यंत दहा लाखांच्या वर शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण केल्या आहेत. शाळेस ग्रामपंचायत सावळज यांचेदेखील खूप सहकार्य लाभले आहे.ग्रामपंचायतीनेही शाळेसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शाळेने शाळेच्या नावावरून सुंदर अशी शिवसृष्टी तयार करून घेतली आहे यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे. शाळेने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.
           शाळेस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले जि प सदस्य,पंचायत समिती सदस्य,सावळज गावचे सरपंच व सदस्य,गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर ,शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे साहेब व  शामल माळी मॅडम,पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे.
पुरस्कारावेळी . बी एस पाटील,.बाळासाहेब जाधव,महादेव  कोळी,अनिल पाटील,शंकर महाले,मुख्याध्यापिका श्रीम.पार्वती कुंभार,शिक्षक रेवणसिद्ध होनमोरे तसेच मोठया संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व स्तरातून कौतुक होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...