शहरामध्ये पोलिओ लसिकरण विशेष मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला.लसिकरणासाठी ३७८९ बालकांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.पैकी ३४४५ बालकांना पोलीओ लसिकरण डोस पाजवण्यात आले.एकूण ९०.९२% लसिकरण पुर्ण झाल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ नागेश लखमावार यांनी दिली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा बिलोली ग्रामीण रुग्णालय शुभारंभ वैद्यकिय अधिक्षक डाँ नागेश लखमावार यांच्या हस्ते करण्यात आला.बिलोली शहरातील ग्रामीण रुग्णालय बिलोली(५६३),मुलींची उर्दू शाळा बिलोली(७०६)नगर परिषद प्राथमिक शाळा(४२२)पंचायत समीती बिलोली(४५३)समाज मंदिर डाँ आंबेडकर नगर बिलोली(४९८),देशमुख नगर बिलोली(४३४)जनक्रांती वाचनालय गांधीनगर बिलोली(३७५)यासह जुना बसस्थानक बिलोली,नवीन बसस्थानक बिलोली व फिरते मोबाइल पथक वर ०-५ वयोगटातील,बाळ० ते ५ वयोगटातील नुकतेच जन्मलेले व यापूर्वी पाजण्यात आले अशा बालकांना लस देण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयामध्ये डाँ सतीश तोटावार, मौलाना अहेमद बेग ईनामदार,संपादक सिद्धार्थ तलवारे, साईनाथ आरगुलवार, जेष्ठ पञकार ए.जी.कुरेशी,रत्नाकर जाधव,शेख फारुख अहेमद,डी.टी.सूर्यवंशी,साजीद कुरेशी,सुनील जेठे,डॉ. केशटवार,सौ.ठाकुर,सहाय्यक पवार,सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा