विक्रम पा.बामणीकर यांच्या प्रयत्नाला यश शिराढोण:- शुभम डांगे
कंधार तालुक्यातील बारूळ येथे प्रधानमंत्री उज्वल गॅस योजनेअंतर्गत मे.मनार एजन्सी धारकाने 100 रुपयांमध्ये उपलब्ध असलेली प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेमार्फत बारूळ परिसरातील औराळ नंदनवन चिखली कैवठा कैवठा वाडी सावळेश्वर बामणी मंगल सांगवी धानोरा व परिसरातील प्रत्येक गावांमध्ये प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना अंतर्गत नागरिकाकडून 500 ते 1500 रुपये घेऊन एजन्सी धारकांनी महिन्यात लोको पती होण्याचे स्वप्न पाहून नागरिकाकडून लाखो रुपये कमवून घेतले आहेत या योजनेत फक्त 100 रुपये घेऊन ग्रामीण भागातील जनतेला गॅस देण्याची ही योजना राबवण्यात आली होती यासाठी मराठा महासंग्राम संघटनेने एजन्सी धारकाने ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केल्याबद्दल जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत झालेल्या लाभार्थ्याकडून जास्तीचे पैसे घेऊन जनतेची फसवणूक केली त्याबद्दल घेतलेले पैसे परत देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत पुरवठा जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक 10/04/2019 एजन्सी धारकाने घेतलेले पैसे परत देण्याचे आदेश दिल्यानंतर प्रधानमंत्री उज्वल योजनेचे मराठवाड्याचे सेल्स मॅनेजर श्री शुक्लाजी यांनी बामणी गावात येऊन थेट लाभार्थ्याची संपर्क साधून त्यांच्याकडून विचारपूस करून घेतली व या चौकशी मध्ये बारूळ येथील मे.मनार एजन्सी धारकाने पैसे घेतल्याचे नागरिकांनी सांगितले व त्यातील सिलेंडर आणण्यासाठी वैयक्तिक प्रत्यक्ष सिलेंडरला शंभर रुपये भाडेही आकारले असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शुक्ला साहेब यांनी सांगितले की सिलेंडर घेतल्यानंतर ते सिलेंडर घरी पोहोचते करून चालू करून देण्याची जबाबदारीही एजन्सीची असल्याचेही सांगितले व त्याचे भाडे आकारले जात नाही त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वजन शनी केलेले लूट घेतलेले पैसे परत तुम्हाला मिळवून देऊ असे प्रधानमंत्री उज्वल योजना अंतर्गत मराठवाड्याचे सेल्स मॅनेजर श्री शुक्लाजी साहेब यांनी बामणी येथील लाभार्थ्याला सांगितले त्यांच्यासोबत तक्रार केलेले मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे व गावातील प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा