बिलोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शहरातील भाजपा यंत्रणा अगदी जोमाने कामाला लागली असुन प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मतदारांच्या दारी भाजप
कार्यकर्त्याच्यां भेटी गाठी होत आहेत
नांदेड लोकसभा भाजपा,सेना,रासप युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ येथील भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष इंद्रजित तुडमे व त्यांचे सर्व सहकारी पदाधीकारी प्रचाराच्या शेवटच्या टप्यात शहरातील प्रभागनिहाय मतदारांच्या भेटीला जात आहेत.भाजप सरकारने केलेल्या विकासकामांचा अजेडां हाती घेवुन मा पंतप्रधान मोदी यांच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात जी विकास कामे झाली ज्या ज्या योजना या काळात जनतेसाठी राबविण्यात आल्या भाजप पक्षाचे ध्येय धोरण या बाबतची इतंबुत माहीती प्रभागातील प्रत्येक घरा घरात जावुन या वेळी सांगण्यात आली
जगभरातील अनेक देश मोदी सरकारच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कामगीरीवर अनेक विचारवंत व्यक्ती त्याचे कौतुक व अभिनंदन केले सर्वच देशाचे लक्ष मोदी सरकारवर आहे.ही निवडणुक देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे जनतेने आपले अमुल्य मत विकासात्मक दृष्टीने देशाची वाटचाल करणाऱ्या भाजप पक्षाच्या उमेदवार प्रतापराव पाटील यांना आपल्या मतदार संघात जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे या प्रभागनिहाय बैठकीच्या माध्यमातुन जन संदेश देण्यात आला
या प्रभागनिहाय फेरीला भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, भाजप शहर अध्यक्ष दिलीप उतरवार सेनेचे युवा ता.उपाध्यक्ष गोविंद गुडमलवार, सेनेचे शहर प्रमुख अशोक तुडमे,भाजपा सरचिटणीस प्रतिक अंकुशकर,शरद खंडेराय,रोशन तुडमे प्रशांत गादगे,राहुल भोजेराव,पवन गादगे,आदीनाथ तुडमे,प्रफुल कल्याणकर,प्रविण सुर्यवंशी,रवि कल्याणकर,प्रितम मामडे, असे असंख्य भाजप सेना पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा