२१ एप्रिल २०१९

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी व्यापक प्रबोधनाची गरज-कमलाकर जमदडे


बिलोली - अंधश्रध्दा ही समाज विकासातील मोठी अडचण असून समाजातील मोठा वर्ग या समस्थेचा बळी ठरला  आहे.त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचे प्रतीपादन अंधश्रध्दा निर्मूलन समीतीचे कार्यकर्त कमलाकर जमदडे यांनी सगरोळी येथे केले.संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने शारदानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या वासंतीक उन्हाळी शिबीरात केले.उन्हाळ्याच्या सुट्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सृजनशीलता वाढावी यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात १५ ते २५ वयोगटातील मुला मुलींना सहभागी करुन घेण्यात आले आहे.सदरील शिबीरात अंधश्रध्दा विषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत.त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांचे सादरीकरण करुन त्यामागी असलेले विज्ञान विषद केले.अनेकदा वैज्ञानिक गोष्टीचा आधार घेऊन समाजातील संधीसाधू त्याला भूतबाधेची उपमा देऊन चमत्कारिक पध्दतीने लोकांची फसवणूक करतात.त्यामुळे आपण चिकित्सक व डोळस होऊन असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थासमोर बोलताना व्यक्त केली.सदरील शिबीर हे पूर्णवेळ निवासी असून त्यात व्यक्तीमत्व विकासासाठीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.सदरील शिबीर हे १५एप्रील ते २४ एप्रील दरम्यान आयोजीत केले आहे.या शिबीरामध्ये प्रेरणादायी व्याख्यान,चिञकला,रांगोळी ,कथाकथन,साहसी मैदानी खेळ,संस्कारक्षम चिञपटइत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.या शिबीराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून संबोधीत करताना जमदडे पुढे म्हणाले.अंधश्रध्दा निर्मूलानासाठी नरेंन्द्र दाभोळकर यांनी अनेक खस्ता खाल्या प्रसंगी त्यामुळेच त्यांना आपले,प्राण गमवावे लागले.त्यांच्यापश्चात अंधश्रध्दा निर्मूलन समीती हे काम नेटाने पुढे नेत आहे.तुम्हीही पुढे जाऊन या विषयी समाजात जाणीवजागृती करावी अशी भावना व्यक्त केली.शिबीराच्या अध्यक्षस्थानी राजेश नरवाडे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य व्यंकटराव कुलकर्णी ,प्रदीप भुसावळे ,शाहूराज काळम,निरंजन महेशकर,होनराव सूर्यकांत, कवडे मॅडम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिबीरार्थींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...