शिराढोण:- (शुभम डांगे)
कंधार तालुक्यातील बारूळ येथे गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी गौंड राहणार बारूळ तालुका कंधार यांचे देशी दारूचे दुकान असून हे दुकान वेळेच्या अगोदर व वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत चालू असते व या ठिकाणी अवैद्य दारू विक्री केली जाते त्याचप्रमाणे दारूची मूळ किंमत सोडून या ठिकाणी चढत्या भावाने दारू उठल्या जात आहे या ठिकाणी नागरिकांनी विचारणा केली असता या दुकानातील व्यक्ती शिवीगाळ करत त्या व्यक्तीस दुकानाच्या बाहेर हाकलून देऊन मारण्याच्या धमक्या देत आहे त्यासाठी मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड श्री पोलीस अधीक्षक साहेब श्री जिल्हाधिकारी साहेब व पोलीस निरीक्षक साहेब उस्मान नगर यांना लेखी निवेदन देऊन वरील अवैधरित्या दारू विक्री करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानाची तात्काळ चौकशी करून व चढत्या भावाने दारू विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे व दिलेल्या निवेदनात वरील दुकानाची पंधरा दिवसाच्या चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे यांची स्वाक्षरी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा