०७ मे २०१९

क्रिकेट सामन्यात तहसिलदार विक्रम राजपुतांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे प्रेक्षकांकडुन कौतुक



बिलोली (सय्यद रियाज)
तालुक्यातील महसुली अवैध धंद्याना आळा घालणारे कर्तव्यदक्ष   युवा तहसिलदार म्हणुन अल्पकालावधीत  नावारुपाला आलेले विक्रम राजपुत हे प्रशासकीय सेवा कार्यासह  क्रिडाक्षेञात देखिल एक पाउल पुढे  आसल्याचे दिसुन आले.ते आज दि.५  मे  रोजी तालुक्यातील  मौ.शिंपाळा येथे आयोजित  क्रिकेटच्या खुल्या सामान्यांचा उद्यघाटनाचा  शुभारंभ तहसिलदार तथा स्टार  व्हिलेवन बिलोली क्रिकेट संघाचे कप्तान विक्रम राजपुत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी जि.प.सदस्य प्रतिनिधी अँडो.शिवकुमार पाटिल  पञकार राजु पाटिल शिंदे  भारतीय लष्करातील  जवान येथिल भुमीपुञ भिमराव मुंगडे ,मा.सैनिक शिवराज साखरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
      नवयुवक क्रिकेट संघ शिंपाळा यांच्या वतिने जय बजरंग बली क्रिडा मैदानावर आज दि.५ मे. पासुन  क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या सामन्यात  विविध ठिकाणच्या  विस ते पंचविस संघानी  सहभाग नोंदवला आसुन आजच्या उद्यघाटन  शुभारंभ दरम्यान तमलुर तालुका देगलुर येथिल बस्वेश्वर क्रिकेट संघ व बिलोली स्टार व्हिलेवन संघ या  उभय संघात जवळपास तिन तास रखरखत्या उन्हात पार पडलेल्या  सामन्यात बिलोली संघाच्या  कप्तानकीचा धुरा सांभाळणारे तहसिलदार राजपुत यांच्या नेतृत्वाखाली  योग्य मार्गदर्शनातुन  या प्रथम शुभारंभाच्या विजयाची माळ आपल्या संघाकडे खेचुन  आणल्याने उपस्थित प्रेक्षकांकडुन राजपुतांची प्रशासकीय कार्यशैली व क्रिडाक्षेञातील  चिकाटीचा  जिव्हाळा भर उन्हातील उत्स्फुर्तपणे उत्कृष्ट  नेतृत्वाची भुमिका बजावत आसताना उपस्थित  प्रेक्षकांकडुन टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाच्या  वर्षावातुन भरभरून कौतुक होताना  दिसुन आले. तसेच या वेळी खेळाचे औचित्य साधुन गावक-यांशी संवाद साधुन  पाणी प्रश्नासह विविध बाबतीत माहिती जाणुन घेतली.  सदर सामन्यातील सर्वप्रथम विजेता  संघास पंधरा हजार तर द्वितीय विजयी  संघास सात हजार रुपयाचे रोख बक्षिस ठेवण्यात आले आसुन मालिकाविर संघास सगरोळी संघाकडुन प्रोत्साहनपर एक हजार एक रुपयाचे तर सर्वोत्तकृष्ट फलंदाज व गोलंदाजास प्रत्येकी पाचशे एक रुपयाचे  रोख पारितोषिक  ठेवण्यात आले. आसल्याचे संयोजक समीतीच्या वतिने सांगण्यात आले.तर अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...