स्पर्धेच्या युगात राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात शामिल व्हा...माजी सनदी अधिकारी श्यामसुदंरजी शिंदे
कंधार /शिराढोण (शुभम डांगे)
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवुन राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन त्यांना या स्पर्धेत सहभागी करा असे आवाहन माजी सनदी अधिकारी श्यामसुदंरजी शिंदे यांनी पेनूर येथील संगमेश्वरा इंग्लिश स्कूलच्या उद्धाटन कार्यक्रमा प्रसंगी केले.प्रास्ताविक मारोती एजगे यांनी केले.पेनूर येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती एजगे यांनी ग्रामिण भागातील नागरिकांच्या मुला-मुलीना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी संगमेश्वरा इंग्लिश स्कुलच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थासाठी सुरु केली असून त्याचे उद्धाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून गुरुवर्य डिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर,अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी श्यामसुदंर शिंदे,सौ.आशाताई शिंदे,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे,माजी नायब तहसीलदार रामराव एजगे,माजी जि.प.सदस्य रावसाहेब शिंदे,शाळेचे संचालक मारोती एजगे,शिवसेना शहरप्रमुख मिलिंद पवार,स्वप्नील गारोळे,चंद्रकांत क्षिरसागर, पत्रकार मोहन पवार,छायाचित्रकार विनोद महाबळे,गुरुनाथआप्पा धोंडे,रामराव मामा लोखंडे,मुख्याध्यापक नरहरी गवते,पत्रकार विरभद्र एजगे,गिरीष एजगे,पत्रकार शुभम डांगे,पांडुरंग पाटील आगलावे,पोलीस पाटील रुक्माजी परडे,अक्षय भैया गुंडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नरहरी गवते तर आभार पत्रकार विरभद्र एजगे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा