पिकविमा व दुष्काळ मदतीसाठी राष्ट्रवादी आक्रमक, दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
शिराढोण:-शुभम डांगे
लोहा कंधार तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परस्थीती आहे, शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पादन झाले नाही, झालेल्या शेतीमालाला भावही मिळाला नाही ...यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाला ...अन..तरीही पिक विमा व दुष्काळ मदत लाभापासुन लोहा कंधार तालुक्याला वगळण्यात आले आहे. ही बाब गंभीर असुन निष्क्रीय लोकप्रतिनिधी व निगरगठ्ठ शासन, प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.लोहा कंधार तालुक्यासाठी दुष्काळ मदत व पिकविमा लाभ तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस दिलीप धोंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
भीषण दुष्काळ, भीषण पाणीटंचाई, शेतीमीलाचे घटलेले उत्पादन, या बाबी ठळकपणे सर्वांच्या समोर असतानाही ...तसेच य़ेथील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आलेली असतानाही जाणिवपुर्वक अन्यायकारक भुमीका लोहा तालुक्याच्या बाबतीत शासन प्रशासनाने घेतली आहे, आणी मुख्यमंत्र्यांच्या जवऴचा म्हणुन मिरवणार्या लोकप्रतिनिधीही या बाबत काही बोलत नाही ...म्हणजे निश्चीतच या भागातील शेतकर्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र आहे.असा आरोप दिलीप धोंडगे यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी मागील वर्षाचा पिकविमा तात्काळ मंजुर करावा, दुष्काळी अनुदान मिळणे, प्रति एकरी पंचवीस हजार रुपये मदत शेतकर्यांना मिळणे ,रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती तात्काळ कमी करणे, लिंबोटी धरणाहुन उदगिर व पालम शहरासाठी पाणीपुरवठा करु नये, लोहा कंधार तालुक्यातील कोलमडलेली विज वितरण व्यवस्था तात्काळ सुरळीत करणे. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. या निवेदनावर राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिलीप दादा धोंडगे ,राष्ट्रवादी कॉग्रेस लोहा तालुकाध्यक्ष संजय पाटील क-हाळे,राष्ट्रवादी जिल्हा कार्यध्यक्ष दत्ता पाटील,कंधार तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर,जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर,लोहा- कंधार विधानसभा अध्यक्ष बाबुराव केंद्रे ,लोहा युवक उपाध्यक्ष शिवराज पाटील पवार,जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख, जि.प.सदस्य ॲड.विजय धोंडगे ,कंधार शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,लोहा- कंधार विधानसभा उपाध्यक्ष दत्ता कारामुंगे,ओबीसी अध्यक्ष अच्युत मेटकर,शत्रु महाराज,मनोज पाटील मोरे,प्रभाकर आढाव,अशोक लोंढे,फुलाजी ताटे,भरत पाटील चिखलीकर ,बंटी सावंत ,गणपत शेवाळे,विष्णू कल्याणकर,शरद पाटील भागानगरे,प्रल्हाद पाटील फाजगे,विठ्ठल पवार नारायण घोरबांड श्याम घोरबांड अविनाश जोमेगावकर सचिन मुंडे आदीच्या स्वाक्षरी आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा