प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्रपुरस्कृत असलेल्या योजनेचे दोन हप्त्याचे 4000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार - बालाजी बच्चेवार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बालाजी बच्चेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधून प्रधानमंत्री सन्मान निधी चे दोन हजार रुपये चा हप्ता शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नसल्याची माहिती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष भेटून केली होती त्यावर मुख्यमंत्री महोदय व कृषिमंत्र्यांनी लवकरच दोन हजार रुपयेच नाही तर दोन हजार रुपयाचे दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये एकत्रितरीत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील अशा पद्धतीच्या सूचना केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या दिवसांमध्ये चार हजार रुपयाची मदत प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत होणार असल्याचे असल्याचे मत माननीय बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा