०९ जुलै २०१९

एमपीएससी चा C-SAT संबंधी निर्णय विद्यार्थी विरोधी -पांडुरंग शिंदे



नांदेड-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका क्रमांक २ ( C-SAT) संदर्भात नेमलेल्या तज्ञ समिती नुसार C-SAT पेपर किमान पात्रता (Qualifying) करता येणार नाही असे आयोगाने जाहीर केले हा निर्णय राज्यातील विद्यार्थी विरोधी आहे व हा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी व्यक्त केले.

  पांडुरंग शिंदे म्हणाले आम्ही अनेक वर्षांपासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचा क्रमांक २ चा पेपर किमान पात्रता (Qualifying )करावा म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तसेच राज्य सरकारने विनंती करत होतो.

  कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या इचलकरंजी येथील पहिल्या मेळाव्यात ,राज्यसेवेचा  C- SAT पेपर किमान पात्रता (Qualifying) करावा असा ठराव केला होता व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते.यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी संघटना प्रयत्न करत होते.आम्ही विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुण्यात भव्य मोर्चे केला होता.

   आयोगाने नेमलेल्या समिती नुसार C-SAT पेपर किमान पात्रता करता येत नाही असे आयोगाने जाहीर ,या पेपरचे मार्क उत्तीर्ण करण्यासाठी ग्राहय धरले जातील असे जाहीर केले .हा निर्णय ग्रामीण भागातील, तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. हा पेपर लागू झाल्यापासून राज्यसेवा परीक्षेत शहरी भागातील तसेच मेडिकल, इंजिनियर पदवीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत.कला शाखेतील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासनात जाऊ नये का?? समान पातळी ठेवली तर स्पर्धा होईल नाही तर भेदभाव होत असेल विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल.
 
   केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) अनुकरण करत आम्ही काम करतो असे राज्य लोकसेवा आयोग सतत सांगत असते, त्यानी C-SAT पेपर किमान पात्रता ठेवली आहे.त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने करावे ही विनंती नाही तर रयत क्रांती संघटना राज्यात पुन्हा लढा उभा करेल ,आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत.

  आम्ही ना.सदाभाऊ खोत यांच्या मार्फत लवकरच एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांची भेट घेऊन हा निर्णय बदल्या साठी विनंती करणार आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...