नायगाव प्रतिनिधी.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली आज नायगाव तहसील कार्यालयात शेतकरी आपल्या मागण्या घेऊन आले होते.
पीक कर्ज वाटप करताना बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना पीक कर्ज व्यवस्थित वाटप करत नाहीत शेतकऱ्यांना त्रास देत आहेत यावर प्रशासन म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत नायब तहसीलदार भोसीकर यांना पांडुरंग शिंदे यांनी धारेवर धरले तास दीड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळाला आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर पाटील, शिवाजी गायकवाड,शहाजी कदम (तालुका अध्यक्ष, रयत क्रांती संघटना),व्यंकट शिंदे,विश्ववनाथ शिंदे,गणेश गायकवाड, आकाश जाधव,गणेश गायकवाड, बालाजी शिंदे असे अनेक शेतकरी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या मागण्या निवेदन नायब तहसिलदार भोसीकर यांना शेतकऱ्यांच्या वतीने पांडुरंग शिंदे यांनी दिले.
पुढील मागण्या केल्या-
१) सन २०१८-१९ पीक विमा लागू करा.
२)खरीब हंगाम सुरू झाला पीक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे.
३)गाव दत्तक नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा.
४)पीक कर्ज देण्यासाठी बँका दलालाच्या साहाय्याने कर्ज वाटप करत आहेत, त्याच्यावर कार्यवाही करा.
पांडुरंग शिंदे यांनी नायगाव तालुक्याचे प्रांत अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना फोन वरून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या व मागण्या सांगितल्या यासर्वांची दखल घेऊन गायकवाड यांनी उद्या (दि.१०/०७/१९.बुधवार ) तात्काळ बँकेच्या मॅनेजरची बैठक बोलावली.या बैठकीत शेतकऱ्यांचे कर्जा संबंधित प्रश्न सोडवू सांगितले आहे. या बैठकीला पांडुरंग शिंदे यांना शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे निमंत्रित केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा