पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा - पांडुरंग शिंदे
नायगाव तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या मागणीनुसार पीक कर्ज वाटप संबंधी तालुक्यातील सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलवली होती.
पीक कर्ज देत असताना बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते,कागदपत्र पूर्ततेच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहेत व दलालयाच्या माध्यमातून बँकेतील कामे होत आहेत अश्या अनेक समस्याला शेतकरी सामोरे जात आहेत,पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, शेतकऱ्यांच्या पाठिशी रयत क्रांती संघटना आहे असे रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी खडसावुन सांगितले.
या बैठकीला जवळपास सर्व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते पण ज्या बँकेच्या सर्वांत जास्त तक्रारी असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (जुनी हैद्राबाद बँक) नायगाव शाखेचा एकही कर्मचारी उपस्थित राहिला नाही.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गट नुसार पीक कर्जाचे मेळावे घेण्याचे आदेश,प्रांत अधिकाऱ्यांनी दिले, या मेळाव्याला बँक मॅनेजर तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या समस्या सोडवण्यासाठी हे मेळावे आहे ,शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी त्या मेळाव्यात सांगावे असे गायकवाड यांनी सांगितले.
गायकवाड म्हणाले की,ज्या बँकेत यापूर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले ती बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे ( गाव दत्तक नाही असे म्हणतात येत नाही)पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रे मागू नये.
या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे शिवाजी पा. गायकवाड, तालुका अध्यक्ष शहाजी पा. कदम,गणेश शिंदे,व्यंकट शिंदे उपस्थित होते.
पीक कर्जे वाटप व तक्रार निवारण मेळवावे पुढील प्रमाणे होणार आहेत.
दि.१२/०७/१९- नायगाव
दि.१५/०७/१९ - बरबडा.
दि.१७/०७/१९ - कुंटुर
दि.१९/०७/१९ - नरसी.
दि.२०/०७/१९- मांजरम.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा