मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांचे केले कौतुक
कुंडलवाडी ( शेख अफजल )
शासनाचा विविध योजने अंतर्गत आम्ही दिलेल्या निधीतून शहराचा चागला विकास करण्यात येत आहे.ते या ठिकाण झालेल्या व चालू असलेल्या विकासकामांना पाहून दिसायला मिळते.येथिल प्रशासकिय अधिकारी नगर परिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे चांगल्या प्रकारे प्रशासन व शहर विकासात्मक कामे करीत असल्यांचे जिल्हाधिकारी मा.अरूण डोंगरे म्हणाले ते कुंडलवाडी नगर परिषदेस दि.12 जुलै रोजी प्रथमच सदिच्छा धावती भेट दिली.
यावेळी मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे मुख्याधिकारी कक्षात जिल्हाधिकारी मा.अरूण डोंगरे व त्यांचा सोबत आलेले उप विभागीय अधिकारी भोसले,नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांचा यथोचित सत्कार केले.यावेळी जिल्हाधिकारी पालिका कार्यालयातील विकास कामे पाहून समाधान व्यक्त केले.या नंतर येथिल के.रामलू मंगल कार्यालयास भेट देवून त्या ठिकाणच्या लाॅन व वृक्षारोपण विकास कामाची पाहाणी केली व तेथून येथील वैकुंठ धाम येथे भेट देवून जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,नायब तहसिलदार,मुख्याधिकारी वृक्षारोपण केले व या ठिकाणी विकासात्मीक कामे पाहून जिल्हाधिकारी म्हणाले स्मसान भुमीत येण्यासाठी लोक भितात पण या ठिकाणचे विकास कामे पाहून नागरीक येथे येवून बसण्यासाठी फिरण्यासाठी घाबरणार नाही असे पण म्हणाले.यावेळी उपस्थित पत्रकार मोहम्मद अफजल व नागोराव लोलापोड पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थांना शासना तर्फे पाच ब्रास रेती मोफत उपल्बध करण्यात येणार असा जी.आर.असतांना शहरातील लाभार्थांना रेती अद्याप उपलब्ध झाली नाही म्हणाले असता या बाबत जिल्हाधिकारी म्हणाले ते जी.आर.ग्रामीण भागासाठी म्हणजे खेडेगावसाठी लागू आहे.नगर पालिका माहा नगरपालिकेसाठी लागू नाही.तरी यासाठी पाठपुरावा चालू असल्यांचे या वेळी ते सांगीतले. शेवटी पालिका प्रशासन अंतर्गत झालेल्या व होत असलेल्या विकास कामाना पाहून जिल्हाधिकारी मा.अरूण डोंगरे यांनी समाधान व्यक्त केले व मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांची स्तूती केली.
यावेळी त्यांचा सोबत बिलोली तालूका उप विभागीय अधिकारी भोसले,नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड उपस्थित होते.
यावेळी पत्रकार शहराध्यक्ष मोहम्मद अफजल,पत्रकार नागोराव लोलापोड,भाजप.शहराध्यक्ष हणमंलू ईरलावार संजय गोनेलवार,शिवा खांडरे,न.प.अधिक्षक लटपटे,साह्यक अधिक्षक गंगाधर पत्की,अभियांता काशेट, कर्मचारी हेमचंद्र वाघमारे,प्रतिक माळवदे, प्रकाश भोरे,मारोती करपे,रमेश नागुलवार,शंकर जायेवार,शुभम ढिलोड,विजू वाघमारे,महेंद्र वाघमारे,वाजीद ईनामदार आदी उपस्थित होते.
,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा