ओबीसी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता युवा पत्रकार खेमेंद्र कटरे यांना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार
गोंदिया : ‘आपल्याकडची माध्यमव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या काळातून जात आहे. विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने माध्यमांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे सर्व आव्हाने स्वीकारून स्वतःची मूल्ये स्वतः तयार केली आहेत, तशीच मूल्याधिष्ठित व्यवस्था आजच्या बदललेल्या, नव्या युगातही तयार केली पाहिजे आणि माध्यमे ती करतील, असा विश्वास मला आहे.तसेच सत्ता निरकुंश होऊ नये यासाठी माध्यमांनी सजग राहण्याची गरज आहे ङ्क असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनातर्फे दिल्या जाणाèया उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२७ जुलै २०१९) मुंबईत फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षांसाठीच्या विविध विभागातील आणि राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी नागपूर विभागस्तरीय ग.त्र्य.माडखोलकर २०१७ वर्षाकरीताच पुरस्कार गेल्या 20 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच ओबीसी बहुजन चळवळीत सक्रिय राहून समाजजागृतीचे कार्यकरणारे बेरार टाईम्स साप्ताहिक व न्युजपोर्टलचे संपादक आणि महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार खेमेंद्र कटरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.कटरे यांना यापुर्वी २००७ मध्ये सुध्दा या पुरस्काराने गौरवान्वित आले आहे. राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाèया महाराष्ट्रातील पत्रकाराना यांवर्षीपासून स्व.अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधी योजना उत्तम कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति कृतज्ञभावनेने सुरू करण्यात आल्याचे मुख्यत्र्यांनी जाहीर केले. राज्याच्या विविध भागांतील २३ ज्येष्ठ पत्रकारांना या कार्यक्रमात पहिला धनादेश प्रदान करून या योजनेची सुरुवात करण्यात आली. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले. नरेंद्र बेडेकर आणि कल्पना ब्रीद-साठे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अजय आंबेकर यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा