नांदेड- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असतानाच,किरकोळ व क्षूल्लक कारणे सांगत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथकांच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याचे काम प्रशासनाने चालवले आहे. कामकाजात सूसुत्रता आणण्याचे परिपत्रक काढण्याच्या बहाण्याने प्रशासनातील वरीष्ठ पातळीवरून कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता,त्यांना व त्यांच्या नियमित कामकाज व जबाबदाऱ्यांना अडचणीत आणणारे परिपत्रक दि. २२ नोव्हेंबर रोजी काढून वरील संपूर्ण विभागच जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे.त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व आस्थापनेवरील विविध संवर्गातील कर्मचारी यांनी एकत्रीत येवून बैठक घेऊन याबाबीचा कडाडून विरोध केला तसेच या अन्यायी परीपत्रक रद्द करण्यात यावे किंवा या परीपत्रकाला न्यायालयामार्फत आव्हान देण्याचे ठरवले.
या बैठकीस राजीव पांडे, सत्यजीत टिप्रेसवार, संजय भोसले,गणेश सातपुते, दिनानाथ जोंधळे,
सुरेश आरगुलवार, उमाकांत वाखरडकर यांनी मार्गदर्शन केले
यावेळी माणीक गित्ते, दशरथ शिंदे, पुष्षराज राठोड, सुभाष कल्याणकर,गिरीश पाटील,मोहन पेंढारे, चंद्रभान धोंडगे, महेश सातारे, रमेश कसबे, मिलिंद राठोड, मनोज सुभाष चव्हाण, तेलंग, रघूनाथ हुंबे, व्यंकटी बकाल,कैलास वरपडे,महमंद पठाण, राजू तुम्मोड, अशोक शिंदे,बाबुराव साळवे, देविदास पेंढारकर,शुभम चाबुकस्वार, किरण कुलकर्णी, हिवताप व हत्तीरोगातील बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते
राजकुमार इंगळे यांनी शेवटी आभार व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा