बिलोलीसाठी तत्काळ कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी द्या-संविधान दुगाने
इंडियन पँथर सेनेचे निवेदन-मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बिलोली प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा व जुना तालुका म्हणून ओळख असणाऱ्या बिलोली तालुक्याच्या शिक्षण विभागाचा कारभार हा गत वर्षभरापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पाहिल्या जात आहे. तर विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखाच्या जागा रिक्त आहेत त्या तत्काळ भरून शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्याबरोबरच शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी इंडियन पँथर सेनाचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण उपसंचालक व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,मागील एक वर्षांपासून बिलोली तालुका शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळत नसल्याने बिलोली तालुक्यात असणाऱ्या ८९जिल्हपरिषद व ६९ खाजगी माध्यमाच्या शाळा आहेत.या शाळांवर नियंत्रण ठेवण्याचे काम गटशिक्षणाधिकारी मार्फत केल्या जाते .मात्र प्रभारी अधिकाऱ्यांमुळे शिक्षण विभागाचे कामकाज रामभरोसे चालत आहे.अशा परिस्थितीत नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग मात्र उदासीन असल्याचे विदारक चित्र दिसत आहे कारण बिलोलीसाठी कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्याऐवजी मुखेडच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.एवढा मोठा शिक्षण विस्तार असलेल्या बिलोली तालुक्याला तीन बिट आहेत फक्त एका बिटास शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असून तेही सध्या दीर्घ रजेवर आहेत.उर्वरित दोन विस्तार अधिकारी पद रिक्त आहेत. तालुक्यातील एकूण नऊ केंद्रप्रमुखापैकी ४ केंद्रप्रमुख पदे भरली असून अनेक वर्षांपासून ५ केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत.त्यापैकी बिलोलीच्या एका केंद्रप्रमुखाकडे तीन केंद्रप्रमुखाचा पदभार असल्याने यात भरच पडली आहे. बिलोली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखाचे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत.त्याचबरोबर एक कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्याची शिक्षण विभागाने तत्काळ नियुक्ती करावी.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.या मागणीसाठी इंडियन पँथर सेना या सामाजिक संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण उपसंचालकांना व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने,जिल्हाध्यक्ष दीपक हटकर,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद युनूस,किरण गायकवाड, आकाश जोंधळे,साईनाथ भद्रिया,अमोल मठपती,कृष्णा गायकवाड,अनंता कच्छवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा