०३ डिसेंबर २०१९

हैदराबाद येथील घृणास्पद कृत्य केलेल्या आरोपीना फाशी देण्याची पत्रकारांची मागणी


बिलोली तालुका मराठवाडा बहुभाषिक पत्रकार महासंघ संघटनेकडून डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुहिक बलात्कार करून त्याला जाळून हत्या केल्याचा निषेधार्थ फाशीची मागणी करत तहसीलदार व पोलीस स्टेशन बिलोली यांना निवेदन देण्यात आले.

तेलंगानातील रंगारेड्डी जिल्ह्यातील एक थरकाप घटना घडली त्या ठिकाणी एका तहसीलदार महिलेस चक्क तिच्या कार्याल्यात जावून जीवंत जाळल्याची प्रकार घडल्या नंतर अवघ्या काही दिवसात दूसरी दुर्देवी घटना हैदराबाद येथील एका पक्षुवैद्यकीय शास्त्री ची विद्यार्थी डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीचा बलात्कार करून जीवंत जाळणाऱ्या आरोपीना त्वरिक्त फाशीची शिक्षा देवून बलात्कारांतील आरोपीचे खटले फास्ट्रेक कोर्टात चालवून दोषीना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी हा घड़लेल्या हा प्रकार संपूर्ण मानव जातीस काळीमा फासणारा आहे .या घटनेचा बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार महासंघा तरफे जाहीर  निषेध करण्यात आला अश्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार तहसील कार्यालय डॉ. ओमप्रकाश गौंड व पोलीस निरीक्षक भगवान धबड़गे पोलीस स्टेशन मार्फ़त राज्यपाल तेलंगाणा यांना देण्यात आले यावेळी  बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद, वलीओद्दीन फारुखी, सचिव सतीश बळवंतकर,जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी,मौलाना अहेमद बेग ईनामदार,शेख युनुस,बालाजी नरहरे,शेख माजीद सर,सय्यद रियाज़,प्रह्लाद भंडारे,सुनील जेठाळकर,हाई पटेल,नागोराव कुड़के आदिचे  स्वाशरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...