बिलोली प्रतिनिधी
तालुक्यातील माचनुर या गावचे ग्राम दैवत श्री खंडोबा देवस्थानचा दरवर्षी प्रमाणे दोन दिवसीय यात्रा उत्सव दि.11 व 12 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे याञोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माचनुर येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ मोठ्या उत्साह व उल्हासाने याञेची जय्यत तयारी करण्यात मग्न झाले आहेत दरवर्षी मोठ्या उत्साहाने व आनंदाने हा यात्रा उत्सव पार पाडतात येथील यात्रा उत्सवा दरम्यान तेलंगणा,आंध्रप्रदेश येथील भाविकांसह महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात
व या यात्रेस आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी माचनुर ग्रामस्थांकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतात
दिं. 11 डिसेंबर रोजी भव्य पशु प्रदर्शन, महाप्रसाद व सायंकाळी 8 वाजता श्री खंडोबा देवाची पालखी मिरवणूक गावातुन काढण्यात येणार आहे. तसेच विविध धार्मिक व संस्कृतीक कार्यक्रम संपन्न होणार आहेत व
दिं.12 डिसेंबर रोजी दुपारी 01 वाजता गावातील कुस्ती समीतीच्या वतीने भव्य कुस्त्याच्या दंगलीचे आयोजन करण्यात आली आहे व येथील कुस्त्याचे बक्षीस 10 रुपयांपासून ते शेवटची कुस्ती 5001 रुपयांची होणार असल्याचे कुस्ती समीती कडुन सांगण्यात आले व महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा राज्यातील नामांकित पैलवान कुस्ती खेळण्यासाठी येथे दरवर्षी येत असतात व मोठ्या प्रमाणात कुस्तांचा फड येथे रंगतो
एकदंरीत मौजे माचनुर तालुका बिलोली येथिल ग्रामस्था मोठ्या हर्ष उल्हासाने याञोत्सवाच्या तयारीला लागले आसल्याचे चिञ माचनुर गावात पहायला मिळते आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा