बिलोली
प्रश्न सीमावर्ती भागाचे याविषयी बिलोली येथे बैठक घेण्यात आली. सीमावर्ती यांच्या प्रश्नाबाबत विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता सत्तेवर आल्यानंतर या प्रश्नाविषयी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या विषयी बिलोली येथे बैठक घेण्यात आली.
संपूर्ण भारतामध्ये तेलंगाना राज्य अल्पावधीत मध्ये चांगले निर्णय घेऊन तेथील राज्यात आपली स्वतःची छबी अत्यंत चांगले करण्यामध्ये यशस्वी राहिलेली आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही शिवसैनिकांनी तेलंगणा राज्यांमध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता .या कालावधीमध्ये बिलोली तालुक्यातील प्रश्न सीमावर्ती भागाच्या प्रमुख समन्वयक आणि समन्वयकांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी देऊन तेथील प्रश्न समजून घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या साह्याने येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माध्यमातून तेलंगाना सारखे आपणही काम करून घेऊ शकू अशी भूमिका मांडून अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. यास प्रशासनाने उदंड प्रतिसाद दिला तसेच लोकप्रतिनिधी यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. सीमावर्ती यांच्या प्रश्नाबाबत तत्कालीन आमदार हेमंत पाटील आमदार सुभाष साबणे यांना वस्तुस्थितीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेतली होती .श्री उद्धव ठाकरे यांच्या या विषयीचा सकारात्मक भूमिकेमुळेच सीमावर्ती भागाचे प्रश्न आणि त्यांची संवेदनशीलता सर्वश्रुत झाली होती. याप्रकरणी तत्कालीन खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही लक्ष घातले होते. वर्तमान परिस्थितीत उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत याप्रकरणी सीमावर्ती भागातील प्रश्नांना अधिक गतिशीलपणे मांडून त्या सोडून घेण्याच्या अनुषंगाने बिलोली येथे दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी बैठक घेण्यात आली .या बैठकीत विविध विकास विषया प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच विगत दोन वर्षात झालेल्या विकास विषय कामांचा आढावाही घेण्यात आला .या बैठकीस प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर' ,समन्वयक श्री गंगाधर प्रचंड श्री व्यंकट सिद्धनोड, श्री गंगाधर पगारे श्री चंद्रकांत लोखंडे यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्या विषयी आणि मांडवाच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा