बिलोली
मुस्लिम,बौद्ध,ख्रिचन,जैन,पारसी,शिख आदि अल्पसंख्यांक समाजाने आपल्या मुलांना शिक्षणाकडे विशेष लक्ष्य द्यावे असे आव्हान मौलाना अहेमद बेग ईनामदार यांनी आज दि.१८ डिसम्बर रोजी बहुभाषिक पत्रकार संघा तर्फे सनशाईन इंटरनेशनल स्कुल येथे आयोजीत अल्पसंख्यांक दिवस निमित कार्यक्रमात ते बोलताना केले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौंड,प्रमुख पाहुने पोलीस निरीक्षक भगवान धबड़गे,वैद्यकीय अधिकारी डॉ. जहिम सिदिखीं,मौलाना अहेमद बेग ईनामदार,जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी,राजू पाटील शिंदे,शेख युनुस भाई कासराळीकरआदिची उपस्थित होती.
अल्पसंख्याक हक्क दिना संदर्भात बोलताना मौलाना अहेमद बेग पुढे सांगितले की देशाची प्रगती शिक्षणावर अवलंबून आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी समाजाला शिका संघटीत व्हावे व संघर्ष करण्याची शिकवण दिली .स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुकलाम आझाद यांनी भारताचे प्रगतीसाठी अनेक शाळा,विद्यालयची स्थापना केली .यावेळी नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौड़ सांगितले की दि.18 डिसम्बर 1992 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेत अल्पसंख्यांक समाज विकासा साठी व अल्पसंख्याका चे हक्कासाठी झालेला बैठकीत 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक दिन साजरा करण्याचा ठरल होते यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबड़गे,जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यकमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मौलाना अबुल कलाम आझाद यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.यावेळी सनशाइन इंटरनॅशनल शालेचे संस्थापक सत्यनारायण अण्णा, लोखंडे,शाळेचे मुख्यापक, शिक्षक विधार्थी आदि उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुभाषिक पत्रकार संघ व शाळेचे उषा मेडम,प्रेमा मेरगो,अनिल तमलुरे, ईमरान सर आदि केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा मेडम केले तर आभार बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांनी मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा