भारतीय जनता पक्ष एक विचारधारा ती लोकचळवळ व्हावी हा उदात्त हेतू अंतकरणात ठेवून 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण ह्या तत्त्वाने गेल्या तीस वर्षापासून अविरतपणे भाजपाचे ध्याय धोरणे ग्रामीण भागात रुजवण्याचे कार्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारा अंगी करून क्रांतिकारी ज्वलंत विचारधारेने प्रेरित असणारे युवा नेते बालाजी बच्चेवार हेच भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देऊ शकतात
नशिबाने मिळालेली पदेही भूषणावह बाब नसून ती जनकल्याणासाठी खर्ची घालावी लागतात .मोठे पणा साठी पद मिळवायचे नसते तर त्याचा लोककल्याणासाठी सदुपयोग करावा लागतो अशी रोखठोक विचार बच्चेवार हे नेहमी मांडत असतात.
आपण पाहतो काही संधीसाधू लोक केवळ पदासाठी हाफहाफ लेले असतात राजकारणात खैरात म्हणून त्यांना ऐनवेळी पदे लागतात अशा संधीसाधू लोकांना जर प्रतिष्ठेची पदे मिळाली तर त्याचा संघटनात्मक बांधणीवर आणि पक्ष वाढीवर मोठा अनिष्ट परिणाम होतो हे जनता जनार्दन अनेक वेळेस अनुभवलेले आहे. मात्र बालाजी बच्चेवार हे एकमेव नेतृत्व असं आहे ज्यांनी आजवर सार्वजनिक जीवनात पदाचा मोह कधीच बाळगला नाही परंतु संघटना वाढीसाठी ,पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे हे विशेष करून मला ह्या ठिकाणी लिहावे वाटते.
श्री बच्चेवार यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच गटातटाच्या व जाती-धर्माच्या नावाने समाजकारण ,किंवा राजकारण केलं नाही सर्व व्यापक विचारधारा, बहुजन विचारधारा आणि पक्षाचा कार्यकर्ता हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होय.
बालाजीराव बच्चेवार यांनी कधीच कार्यकर्त्यांना अंतर दिलं नाही ,दुजाभाव केला नाही पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाचा अंतर असता कामा नये .यश किंवा अपयश कमी-अधिक चालेल पण कार्यकर्ता टिकला पाहिजे तरच पक्ष टिकेल हीच विचारधारा त्यांची लोकप्रिय आहे .एवढा मोठा विचार घेऊन त्यांनी आजवर पक्ष वाढीची वाटचाल केली हे मी जवळून अनुभवलेलं आहे.
काही लोकांना ऐन वेळेस संधीसाधू वृत्तीने स्वार्थासाठी आणि मोठेपणासाठी खोट्या प्रतिष्ठेसाठी पक्षाची पदे पदरात पाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात परंतु पक्षवाडीत त्यांच काहीएक योगदान नाही.
परंतु केवळ आजवर निस्वार्थपणे जीवघेना राजकीय संघर्ष करून आर्थिक परिस्थिती नसताना गोरगरीब कार्यकर्ते सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत बच्चेवार यांनी स्वतल्ला ः वाहून घेतले आहे.
त्यांना हे माहीत होतं एका दाण्याचे शंभर दाणे करायचे असतील तर एका झाडाला कणीस यायचा असेल तर मात्र एका ज्वारीच्या दाण्याला मातीत गाडून घ्यावे लागते तरच त्या दाण्यातून झाड होऊन शंभर दाण्याचे कनिस निर्माण होते त्यासाठी एक दाणा मात्र स्वतःला जमिनीत गाडून घ्यावा लागतो. त्याच तत्त्वाने त्यांनी स्वतःला भाजपाच्या विचारधारेत गाडून घेऊन पक्षासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे .हे मात्र त्रिवार सत्य आहे हा त्याग अत्यंत मोलाचा आहे स्वतःच्या आयुष्यातील तीस वर्ष बच्चेवार यांनी भाजपासाठी समर्पित केल आहे ह्या त्यागाचं मोल कशातच नाही?
म्हणून बच्चेवार हेच जिल्हाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत. बालाजी बच्चेवार हेच भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देऊ शकतात हे मी ठामपणे सांगू शकतो असा माझा विश्वास आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा