कंधार - कंधार तालूक्यातील भुकमारी गावाजवळ सुगाव प्रकल्प 1969 साली झाले. तलावाचे पाणी घरात शिरल्याने 67 घरे बाधित झाली होते. 42 वर्षा पासून गावचे पुनर्वसन रखडले आहे.
2012 ते 2014 उपोषन व पाठ पुरावा करण्यात आला होता. पन आद्यापही पुनर्वसन झाले नाही गावात 30 ते 35 घरे पडून गेले आहे . म्हणून काहीजन नांदेड जिल्हातील इतरञ तालुक्यात तर काही जन तेलंगणातील निझामाबाद येथे राहुन मोलमजुरी करु लागले गावात राहणाऱ्याची संख्यापन दिवसेंदिवस कमीहोत चालली आहे. दि 14 जानेवारी रोजी कंधारचे उपजिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी सुगाव प्रकल्पा मुळे 67 घरांचे पूनर्वसन करण्या संदर्भात गावातील गावठाण जमिन , गावातील बाधित घरांची पाहणी करुन पुनर्वसन संदर्भात गावातील नागरिकांशी चर्चा करण्यात आली, कंधार तहसिलचे तहसीलदार सखाराम मांडवगडे ,कार्यकारी अभियंता पत्तेवार पाटबंधारे विभाग व त्यांचे सहकारी, तलाव व जमिनीची पाहणी केली या वेळी बारुलचे मंडळ अधिकारी जेहरुनिसा खान , अव्वल कारकुन गीत्ते , हळदाचे तलाटी सुञावे एस.एस, ग्रामसेवक पोटेवार टी.जी. अदि कर्मचारी उपस्थित होते.
गाव हा नाले , तलाव ,नदिच्या मध्ये आहे तलाव भरले की पाणी गावात शिरते . बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग राहत नाही.पुनर्वसन अनेक वर्षा पासून रखडल्याने तलावा मधुन येणारे साप विंचु ईतर किटकांचा नागरीकांना ञास सहन करावा लागत आहे. पुनर्वसन त्वरीत करण्याची मागणी गावातील नागरिकां कडून करण्यात आली.
या वेळी माजी.सरपंच सय्यद अहेमदसाब, उपसरपंच माधव अडकीने,पोलीस पाटील लक्ष्मण गवाले,सय्यद याकुबसाब,सय्यद जमालोदीन,माधव पवार,ज्ञानोबा कांगुले,बापुराव निम्मेवाड,माधव कांगुले, अदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा