भोकर- राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम अंतर्गत दि. १९ जानेवारी २०२० रोजी भोकर शहरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहीम लस पाजविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय भोकर अंतर्गत एकुण २१ बुधवर एकुण ४२०५ लाभार्थी पैकी ३८७६ बालकांना पोलीओ लस (९२.१८ टक्के) पाजविण्यात आली. ३ ट्रान्झीट टीम व १ मोबाईल टिम वर ३६८ लाभार्थ्यांना लस पाजविण्यात आली.डॉ संतोष शिरसीकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा नोडल अधिकारी, डॉ विवेक दिक्षित, रमेश पतंगे जिल्हा स्तरीय पथक यांनी भोकर शहरातील विविध बुथ यांना भेट दिली व काम समाधानकारक असल्या बद्दल समाधान व्यक्त केले.डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरिल पोलीओ मोहीम यशस्वी करण्यात आली व पुढील पाच दिवस घरोघरी भेट देऊन ५ वर्षातील बालके कोणी शिल्लक राहिले नाहीत याचा सर्वे करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ माधव विभूते, डॉ. दिलीप फुगारे, डॉ कोळेकर, डॉ थोरवट, डॉ टाकळकर, सत्यजीत टिप्रेसवार, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, मनोज पांचाळ,श्रीमती चव्हाण, कुलकर्णी,गेडाम, मादाळे, दिवटे,गुट्टे,पंदीलवाड, ठाकूर, संतोष पांचाळ, शेळके, नरडे, दरबस्तवार,मल्हार मोरे,बबलू चरण, प्रकाश भक्ते, गणेश गोदम, राजू चव्हाण, स्वयंसेवक, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर,नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थीनी यांच्या मार्फत सदर मोहीम राबविण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा